श्रीगोंदा तहसील कार्यालयातील जमीन गैरव्यवहार प्रकरणी तहसीलदारांवर कारवाई न झाल्यास.! जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल-ताशांसह आंदोलन..:ॲड.संभाजी बोरुडे..

दिनांक १२ फेब्रुवारी २०२५,श्रीगोंदा:

श्रीगोंदा तहसीलदार व त्यांच्या दोन कनिष्ठ अधिकाऱ्यांनी नियमानुसार चौकशी न करता ख्रिश्चन संस्थेच्या नोंदणीकृत जमिनीचे हस्तांतरण केल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा (गु.र.नं. ३५/२०२५) दाखल झाला असला तरी, मुख्य सूत्रधार तहसीलदार व इतर अधिकाऱ्यांना आरोपी करण्यात आलेले नाही.

यासंदर्भात संविधान बचाव तहसीलदार हटाव जनआंदोलन सभा नुकतीच पार पडली. अधिवक्ता संभाजीराव बोरुडे यांनी महसूल मंत्री, जलसंपदा मंत्री, मुख्य सचिव, पोलीस महासंचालक यांना निवेदन देत तहसीलदारांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे. तसेच, जर दहा दिवसांत कार्यवाही झाली नाही, तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल-ताशांसह आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

स्रोत:(अँड.संभाजी बोरुडे यांचे निवेदन)

Advertise…

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading