नव्या पोलीस निरीक्षकांचे या गंभीर बाबींकडे दुर्लक्ष..? विशेष सुधारणा नाही..!

दिनांक १७ ऑगस्ट २०२४, श्रीगोंदा:

श्रीगोंदा शहरातील शैक्षणिक संस्थांच्या वाढत्या संख्येसह विद्यार्थ्यांची वाढणारी उपस्थिती शहराला नवीन नाही. परंतु यामुळे प्रवासादरम्यान होणारे वाद आणि हाणामाऱ्या देखील वाढत आहेत, ज्यामुळे शहरातील शांतता धोक्यात आली आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्यावर ठोस कारवाई करण्याची जबाबदारी आली आहे.

अलीकडेच श्रीगोंदा शहरातील एका नामांकित कॉलेजच्या गेटवर झालेला वाद, एसटी स्टँड परिसरात टवाळखोरांचा उपद्रव आणि कॉलेज परिसरात सर्रास होणाऱ्या भांडणांमुळे अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. मागील महिन्यात किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीत गंभीर जखमी होणाऱ्या विद्यार्थ्यांमुळे हे प्रकरण शहरात चर्चेचा विषय बनले होते.

आज पुन्हा श्रीगोंद्यातील एका प्रतिष्ठित कॉलेजसमोर असाच किरकोळ वाद घडून परिसरात दहशत निर्माण झाली. शाळा, महाविद्यालये आणि त्याच्या आसपासच्या परिसरातून आपल्या घराकडे प्रवास करणाऱ्या किंवा घरातून शाळेकडे जात असलेल्या विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न यापूर्वीही चर्चेत आलेला आहे. परंतु नव्याने आलेल्या पोलीस निरीक्षकांकडून विशेष सुधारणा होत असल्याचे दिसून आलेले नाही.

आजही कॉलेज शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात टवाळखोर आणि मोटरसायकलस्वार, फटाके वाजवत गाड्या चालवत असल्याचे चित्र आहे. एसटी स्टँड परिसरात विद्यार्थ्यांमध्ये रोजचा वाद सुरूच आहे. या परिस्थितीवर आळा घालण्यासाठी स्थानिक पोलीस प्रशासनाने शाळा, महाविद्यालय परिसरात पोलीस गस्त वाढवावी, तसेच एसटी स्टँड परिसरात पोलीस पथक तैनात करावे, अशी मागणी पालक, शाळा आणि महाविद्यालय प्रशासनाकडून जोर धरत आहे. पुढील काळात या विषयावर साहेब काय निर्णय घेतील..? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

स्रोत:(मिळालेल्या माहितीनुसार)

जाहिरात…

Leave a Reply