चक्रीवादळ ‘शक्ती’चा महाराष्ट्रावर परिणाम: कोकण व मध्य महाराष्ट्रात रेड अलर्ट; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन..

दिनांक १६ मे २०२५, मुंबई:

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ या चक्रीवादळामुळे महाराष्ट्राच्या हवामानात मोठा बदल झाला असून, कोकण व मध्य महाराष्ट्रासाठी पुढील ४८ तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. भारतीय हवामान खात्याने मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह कोकण आणि काही भागांतील मध्य महाराष्ट्रासाठी रेड अलर्ट जारी केला आहे.

या चक्रीवादळामुळे राज्यात जोरदार पावसासह ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, काही भागांत विजांच्या कडकडाटासह वादळी वारे देखील होऊ शकतात. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे, अनावश्यक प्रवास टाळण्याचे आणि सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन केले आहे.

भारतीय हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार, ‘शक्ती’ चक्रीवादळाचा थेट फटका पश्चिम बंगाल, ओडिशा आणि बांगलादेश या किनारी भागांना बसणार असला, तरी त्याचा अप्रत्यक्ष परिणाम महाराष्ट्रातही जाणवतो आहे.

कोकण किनारपट्टीसह रायगड जिल्ह्यात मे अखेरपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुंबई आणि उपनगरांत अवकाळी पावसाने हजेरी लावली असून, आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील तीन ते चार आठवड्यांत राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे. हे हवामान बदल मान्सूनच्या आगमनापर्यंत सुरू राहतील. त्यामुळे शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.

सावधगिरीचे उपाय:

  • विजेच्या गडगडाटात उघड्यावर राहू नका
  • झाडाखाली किंवा विजेच्या खांबाजवळ थांबू नका
  • शक्य असल्यास घरातच थांबा
  • गरज असल्यास स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधा

राज्यातील प्रशासन यंत्रणा सतर्क असून, स्थानिक यंत्रणांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत स्त्रोतांकडून मिळणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

स्रोत:(ऑनलाईन वृत्त)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading