शिवांश मशरूम फार्म व गांडूळ खत प्रकल्पाचे उद्घाटन थाटात संपन्न.. खा. निलेश लंके यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन समारंभ..

दिनांक ४ फेब्रुवारी २०२५,श्रीगोंदा:

शहराच्या मांडवगण रोडलगत असलेल्या आळेकर मळ्यात श्री सचिन रोही आणि त्यांच्या परिवाराने सुरू केलेल्या शिवांश मशरूम फार्म व गांडूळ खत प्रकल्पाचा उद्घाटन समारंभ शुक्रवारी दुपारी ३:०० वाजता मोठ्या उत्साहात पार पडला.

या समारंभाला खासदार निलेश लंके यांच्या प्रमुख उपस्थितीबरोबरच नगराध्यक्ष मनोहर पोटे, पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव (कर्जत), प्रतापसिंह पाचपुते, माजी जि.प. सदस्य अनिल ठवाल, कॅनरा बँकेचे वरिष्ठ व्यवस्थापक सतीश कुमार व स्टाफ, नगरसेवक शहाजी खेतमाळीस, संजय खेतमाळीस, शिवाजी शेळके, दादासाहेब औटी, अनिल औटी, पत्रकार चंदन घोडके, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष माधव बनसोडे, मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष पिटर रणसिंग, सचिव अमोल झेंडे, कॅशियर सतीश दांडेकर, बाळासाहेब दांडेकर, महादेव पारे सर (सायन्स फोरम कोचिंग), महेंद्र पारे सर, मशरूम उद्योजक तात्या लखे, अशोक लबडे, शहाजी ढवळे, वैभव झिंजाडे, प्रशांत आळेकर, सुनील रोही आदी मान्यवर उपस्थित होते.

मशरूम फार्म व गांडूळ खत प्रकल्प हा व्यवसाय सचिन रोही यांच्या वडील पोपट रोही यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे कुटुंबीय आई शशिकला रोही, सौ. स्वामिनी सचिन रोही, पत्रकार नितीन रोही, सौ. पूजा नितीन रोही, विनोद वाघमारे आणि शुभम मालकर हे सर्वजण एकत्रितपणे यशस्वीरित्या हाताळत आहेत. या अभिनव उपक्रमामुळे श्रीगोंदा तालुक्यात रोही परिवाराचे विशेष कौतुक होत आहे.


ऑयस्टर मशरूमचे आरोग्यदायी फायदे:

. पोषणमूल्यांचा खजिना:
प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे (B आणि D) तसेच कॅल्शियम, लोह यांसारखी खनिजे मुबलक प्रमाणात उपलब्ध.

. हृदयासाठी उपयुक्त:
कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करून हृदय निरोगी ठेवते.

. रोगप्रतिकारशक्ती वाढवते:
अँटीऑक्सिडंट्समुळे शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत होते.

. कर्करोगविरोधी गुणधर्म:
काही तत्त्वे कर्करोगाच्या वाढीला आळा घालण्यास मदत करतात.

. वजन नियंत्रण:
कमी कॅलरी व उच्च फायबरमुळे वजन कमी होण्यास मदत होते.

. डायबेटिससाठी फायदेशीर:
रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त.

७. हाडे मजबूत करते:
कॅल्शियम व जीवनसत्त्व D मुळे हाडांची मजबुती वाढते.

ऑयस्टर मशरूम नैसर्गिक सुपरफूड असून आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.

रोही परिवाराचा हा उपक्रम परिसरातील तरुणांना कृषी उद्योगासाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

स्रोत:(आयोजीत कार्यक्रम)

Advertise..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading