छत्रपती शाहूंचा अपमान; निलेश साबळेची जाहीर माफी.

दिनांक १५ मार्च,मुंबई:

चला हवा येऊ द्या’ या विनोदी कार्यक्रमात राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराजे गायकवाड यांच्या प्रतिमांचा चूकीच्या पद्धतीनं वापर केल्याबद्दल कार्यक्रमाचा सुत्रसंचालक निलेश साबळे यानं जाहीर माफी मागीतली आहे.

छत्रपती शाहूंचा अपमान झाल्यानंतर वादावर स्पष्टीकरण देत निलेशनं जाहीर माफी मागितली आहे. निलेश साबळेचा एक व्हिडिओ वाहिनीच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. ‘कार्यक्रमात सादर करण्यात आलेल्या स्किटमध्ये फोटो हा वेगळ्या अर्थानं दाखवण्यात आला होता. स्किटमध्ये वापरण्यात आलेला फोटो शाहू महाराजांचा नव्हता. तांत्रिक गोष्टीमधून ही चूक झाली असून…घडलेल्या प्रकाराबद्दल आम्ही क्षमस्व असल्याचं निलेश साबळेनं या व्हिडिओत म्हटलं आहे.

‘चला हवा येऊ द्या’मधील एका भागात या शोचे कलाकार छत्रपती शाहू महाराजांच्या वेषात दाखविले होते. त्यामुळं त्यावर शाहूप्रेमींनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली होती. हा शाहू महाराजांचा अवमान असून या शोच्या कलाकारांनी माफी मागावी, अशी मागणी होत होती. खासदार छत्रपती संभाजी राजे यांनीही या प्रकारावर ट्विटरद्वारे तीव्र शब्दांत भावना व्यक्त केल्या होत्या.

(वृत्तसंस्था)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading