दिनांक १४ मार्च,अ.नगर :
जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ११४ ठिकाणी छापे टाकून ४२ लाख ७५ हजार ८४७ रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.त्यामध्ये १३३ आरोपींविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे यांच्या आदेशाने प्रभारी पोलीस अधीक्षक डॉ. सागर पाटील, अपर पोलीस अधीक्षक दिपाली काळे – कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार व त्यांच्या पथकाने जिल्ह्यातील अवैध धंद्याविरुद्ध विशेष मोहिम राबवून देशी – विदेशी दारु, रोख रक्कम,मटका जुगार साहित्य,गावठी दारु,वाळू व वाहने जप्त केली आहेत.
गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नेवासा, कोतवाली, तोफखाना, श्रीगोंदा, एमआयडीसी, बेलवंडी, नगर तालुका, श्रीरामपूर शहर, श्रीरामपूर तालुका, राहुरी, सोनई, जामखेड, भिंगार कॅम्प, शेवगाव, कोपरगाव, शिर्डी, शेवगाव, पारनेर, सुपा, शनिशिंगणापूर, पाथर्डी, कर्जत, संगमनेर, लोणी या पोलीस ठाणे हद्दीत छापे टाकून १३३ जणांवर गुन्हे दाखल करून ४२ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
(वृत्तसंस्था)
