दिनांक १५ जुलै २०२४, श्रीगोंदा:
मातंग एकता आंदोलन महाराष्ट्र राज्य संघटनेचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष महेश चव्हाण यांनी खासदार संजय राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात कार्यकर्त्यांसह जाहीर प्रवेश केला. यावेळी वसंत मोरे, शिवसेना उपनेते साजन पाचपुते, राणीताई लंके, उपजिल्हा प्रमुख संदेश कार्ले, तालुका प्रमुख विजय शेंडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
शनिवार दिनांक १३ जुलै २०२४ रोजी श्रीगोंदा येथे साजन पाचपुते यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यात हा प्रवेश कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात खा. संजय राऊत यांनी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत केले आणि साजन पाचपुते यांच्या संघटन कौशल्याचे कौतुक केले. त्यांनी महेश चव्हाण आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे संघटनेला आणखी बळकटी मिळेल, अशी आशा व्यक्त केली.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या या नव्या सदस्यांनी संघटनेच्या ध्येयधोरणांना समर्पित राहून काम करण्याचे वचन दिले आहे. महेश चव्हाण यांनी यावेळी आपला शिवसेनेच्या नेतृत्वावर विश्वास असल्याचे सांगितले. त्यांनी कार्यकर्त्यांसह पक्षाच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याची तयारी दर्शवली आहे.
या प्रवेश सोहळ्यात उपस्थित असलेल्या मान्यवरांनी महेश चव्हाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले आणि आगामी काळात संघटनेला त्यांच्या योगदानाची अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी एकत्र येऊन पक्षाच्या ध्येयधोरणांशी एकनिष्ठ राहण्याची प्रतिज्ञा केली.
स्रोत:(आयोजीत कार्यक्रम)






