दिनांक १४ जुलै २०२४,श्रीगोंदा:
मोहरम पर्वातील ताजिया स्थापनेची परंपरा श्रीगोंदा येथे आजही उत्साहाने पाळली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा श्रीमंत मालोजीराजे भोसेले यांचे गुरू सुफी संत शेख महंमद बाबा दर्गाह येथे, ताजिया स्थापनेची परंपरा शेख महंमद बाबा यांच्या वंशजांनी जतन करून ठेवली आहे.
या वर्षी, सालाबाद प्रमाणे, दिनांक ८ जुलै २०२४ रोजी ताजिया (ताबुत) ची स्थापना करण्यात आली आहे. मोहर्रम उत्सव १० दिवस चालणार असून, शेख महंमद बाबा दर्गाहमध्ये धर्मिक प्रवचने, सरबत वाटप, रोट प्रसाद वाटपाचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. बुधवारी, दिनांक १७ जुलै २०२४ रोजी सायंकाळी ७:०० वाजता ताजियाची श्रीगोंदा शहरातून सवाद्य वाजवत मिरवणूक काढून विसर्जन करण्यात येणार आहे.
शुक्रवार, दिनांक १९ जुलै २०२४ रोजी सकाळी ११:० वाजता शेख महंमद बाबा दर्गाह येथे तिजारत (खिचाडा, महाप्रसाद) कार्यक्रम होणार आहे. ताजियाचे सर्वधर्मीय भाविक येथे येऊन दर्शनाचा लाभ घेतात आणि नवसपूर्ती करतात. असे शेख महंमद बाबा दर्गाह चे ट्रस्टी व वंशज राजु शेख यांनी माध्यमांना माहिती दिली आहे.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)






