विवाहितेचा विहिरीत बुडून मृत्यू…नवरा व सासूच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा मुलीच्या आईचा आरोप..

दिनांक २ एप्रिल(टाकळी कडेवळीत,श्रीगोंदा):

तालुक्यातील टाकळी कडेवळीत शनेश्वर मच्छिंद्र नवले आणि त्याची आई मिराबाई मच्छिंद्र नवले यांच्या जाचाला कंटाळून अर्चना शनेश्वर नवले वय वर्षे २७ हीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याबाबत मुलीची आई श्रीमती रंजना अरुण पालेकर राहणार साबळेवाडी, तालुका बारामती, जिल्हा पुणे यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

यात त्यांनी नमूद केले आहे की, अर्चनाचे लग्न दहा वर्षांपूर्वी शनेश्वर मच्छिंद्र नवले याचे बरोबर झाले होते. लग्न झाल्यानंतर साधारण दोन वर्ष अर्चनाला चांगली वागणूक मिळाली. मात्र, त्यानंतर तिचा पती शनेश्वर व सासू मीराबाई कामाच्या बाबतीत तक्रारी करत व मुले होत नाहीत म्हणून, तिला छळत करीत उपाशी ठेवत होते. अर्चना माहेरी आल्यावर याबाबत सर्व सांगत होती. परंतु, आर्थिक परिस्थिती गरिबीची असल्यामुळे आम्ही तिला समजून सांगत नांदायला पाठवत होतो. दोन मुली झाल्यानंतरही काही ना काही कारणावरून पती व सासू अर्चनाला छळत होते. याबाबत दिनांक १ एप्रिल रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अर्चनाने आईकडे फोन करुन, होत असलेल्या त्रासाबद्दल कळविले. नंतर सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सासू मीराबाईने फोन करून अर्चना विहिरीत बुडून मयत झाल्याबाबत अर्चनाच्या आईस सांगितले.(Married woman drowns in well)

https://bit.ly/bspmycityshrigonda

याप्रकरणी मुलीची आई रंजना यांनी घरच्यांकडून होत असलेल्या जाचामुळे अर्चनाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याबाबत गुन्हा दाखल केला. दिलेल्या माहितीनुसार नवरा व सासू दोघांवर भादवि कलम ३०६, ३४ व ४९८(अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्रोत:(फिर्याद)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading