दिनांक २ जानेवारी, श्रीगोंदा:
मोक्का कायद्याअन्वये कारवाईसाठी बेलवंडी पोलिस ठाण्याच्या माध्यमातून प्रस्ताव विशेष पोलिस महानिरीक्षकांकडे पाठवण्यात आला होता. लागलीच त्यास परवानगी देण्यात आली असल्याची अधिकृत माहिती मिळत आहे. MCOCA action against a gang of 6 persons in Shrigonda.
गुन्हेगारीत सराईत झालेल्या पुणे व नगर जिल्ह्यातील शिरूर, बेलवंडी, श्रीगोंदे, पारनेर व सुपे पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात गुन्हेगारीचे केंद्र बनविलेल्या ६ जणांच्या टोळीवर मोक्का (MCOCA) नुसार कारवाई करण्यात येणार आहे.

विशेष पोलिस महानिरीक्षकांनी तशी परवानगी दिल्याची माहिती बेलवंडी पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी दिली आहे. नगर व पुणे या दोन जिल्हयातील विविध गुन्हेगारांची माहिती संकलीत करण्यात आली होती. यात संघटीत गुन्हेगारी टोळ्यां विरोधात मोक्का कायद्यान्वये कारवाई केली जाते.
बेलवंडी, श्रीगोंदा, शिरुर, पारनेर पोलिस ठाण्यात शंभ्या उर्फ शंभु कुंज्या चव्हाण (वय २८ वर्षे, सुरेगाव, ता.श्रीगोंदे) हा टोळीचा प्रमुख आहे. त्याच्यासोबत राजु जावेद चव्हाण, घड्याळ्या हिरामण चव्हाण, रेबीन घड्याळ्या चव्हाण, ओंकार कुंज्या चव्हाण (सर्व सुरेगाव), बाबुश्या चिंगळ्या काळे (वय २० वर्षे, रा.वांगदरी ता.श्रीगोंदा), जितेंद्र रॉकेट चव्हाण (वय २५ वर्षे, रा.पढेगाव ता.श्रीरामपुर, हा जावई आहे.) या सहा जणांवर दरोडा टाकणे, स्वस्त सोन्याचे आमिष दाखवून लूट करणे, जबरी चोरी करणे, घातक शस्त्रासह जबरी चोरी करणे, घरफोडी करणे, दरोड्याची तयारी करणे, फसवणूक करुन दरोडा टाकणे अशा स्वरुपाचे गुन्हे कट करुन दशहत निर्माण करत नुकसान यासारखे अनेक गुन्हे दाखल आहेत.
स्रोत:(ऑनलाईन वृत्त)
