दिनांक २ जानेवारी, श्रीगोंदा:
सौताडा च्या धबधब्यावरून उडी घेत आत्महत्या केलेले ग्रामसेवक झुंबर गवांदे हे राम घोडके उपसरपंच वलगुड ग्रामपंचायत, श्रीगोंदा यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्येस प्रवृत्त झाले बाबत मयत गवांदे यांच्या पत्नी मनीषा गवांदे यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यांत भा द वि कलम ३०६ प्रमाणे गुन्हा नोंदवला होता.
मात्र, या गुन्ह्यामध्ये राम घोडके यांना निव्वळ राजकारण व जातीय द्वेषापोटी स्थानिक पोलीसांच्या मदतीने अडकवल्याचा आरोप राम घोडके यांच्या पत्नी अश्विनी उर्फ शितल रामदास घोडके यांनी पोलीस अधीक्षक अहमदनगर यांना दिलेल्या निवेदनात केला आहे.

याबाबत सविस्तर असे की, दिनांक तीन ऑक्टोबर २०२१ रोजी रामदास घोडके यांच्यावर श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये कलम ३०६ प्रमाणे झुंबर गवांदे या ग्रामसेवकाच्या आत्महत्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामधील फिर्यादी मनीषा झुंबर गवांदे यांनी दिनांक २ ऑक्टोबर २०२१ रोजी म्हणजे आदल्या दिवशी प्रतिभाताई पाटील भद्रकाली नारीशक्ती सामाजिक संस्था पुणे यांना लिहिलेल्या निवेदनामध्ये खांडगाव/वलगुड ग्रामपंचायतीचे सरपंच मंगल कारभारी ढवळे, सरपंच पती कारभारी ढवळे व ग्रामपंचायतीचे उरलेले सदस्य हे सर्व फिर्यादीचे पती झुंबर गवांदे यांचा आत्महत्या जबाबदार असल्याचे निवेदन दिलेले आहे.
हा गुन्हा तात्काळ दाखल न करता राजकीय पुढारी सरपंच मंगल कारभारी ढवळे व तिचे पती कारभारी ढवळे यांनी फिर्यादी बरोबर संगणमत साधत, दिनांक ३ ऑक्टोबर २०२१ रोजी ७:४४ वाजता श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये रामदास घोडके व आनंद शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. यामधून २ ऑक्टोबर २१ रोजी लिहिलेल्या प्रतिभाताई पाटील भद्रकाली नारीशक्ती सामाजिक संस्था पुणे या निवेदनातील सवर्ण समाजातील सरपंच तिचे पती व इतर सदस्य यांना वगळून, फक्त अनुसूचित जाती मधील रामदास घोडके व आनंद शिंदे यांना यंत्राद्वारे अडकवण्यात आल्याचा आरोप अश्विनी घोडके यांनी वरिष्ठ कार्यालयाला दिलेल्या निवेदनातून केला आहे.

२ ऑक्टोबर २१ रोजी लिहिण्यात आलेले निवेदन ज्यात सर्व पदाधिकाऱ्यांचा उल्लेख होता. ते तात्काळ पोलीस स्टेशनला येऊन, दाखल न करता दुसऱ्या दिवशी संध्याकाळी उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. या दरम्यान राजकीय पुढारी बाळू महाडिक (जिल्हा सरचिटणीस भाजपा), सरपंच मंगल ढवळे तिचे पती कारभारी ढवळे यांनी मोठे षडयंत्र रचत, फिर्यादी बरोबर संधान साधत मोठ्या राजकीय पुढाऱ्यांच्या सहकार्याने सरपंच व तिच्या पतीला वगळत फुले-आंबेडकर चळवळीतील उपसरपंच रामदास घोडके व आनंद शिंदे यांना गुंतवले.
याकामी API विठ्ठल पाटील यांच्या संगनमताने आमच्या कुटुंबावर मोठा अन्याय करण्यात आला आहे. राजकीय षड्यंत्राद्वारे कपोलकल्पित कहाण्या मांडण्यात आल्या आहेत. असे त्यांनी निवेदनात नमूद केले आहेत.
राम घोडके यांच्यामुळे पंचवीस ते तीस वर्ष सत्ता असणाऱ्या बाळू महाडिक यांची सत्ता उलटल्याने ते हवालदिल झाले होते व भाजपाच्या या राजकीय पुढाऱ्याच्या पोलिस प्रशासनाच्या मदतीने राजकीय सूड भावनेने व जातीय द्वेषाने रामदास घोडके व आनंद शिंदे यांना गुंतवले आहे. The victim’s family will go on a hunger strike tomorrow after committing a political conspiracy and being caught in a false crime of caste hatred with the connivance of police officers.
सरपंच पती कारभारी ढवळे, बाळू महाडिक, राम महाडिक व प्रस्थापित पुढार्यांचे कॉल डिटेल्स चेक करावेत. तसेच, नारी शक्ती सामाजिक संस्था पुणे यांना लिहिलेल्या पत्रातुन सवर्ण समाजातील लोकांना वगळण्यात आले. यासाठी पोलीस अधिकारी API विठ्ठल पाटील यांनी मोठी आर्थिक तडजोड केल्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच, मंगल ढवळे व कारभारी ढवळे यांनी रामदास घोडके यांनी ग्रामपंचायतीची खोटे लेटरपॅड, खोटे सिक्के वापराची खोटी साक्ष पोलीस स्टेशनला देऊन, माझे पती रामदास घोडके यांना गुंतवले आहे. हे सर्व केवळ जातीयद्वेष व राजकीय प्रक्रियेतुन घडलेले आहे.
नमूद सर्व बाबींची चौकशी करून, माझ्या कुटुंबाला न्याय मिळावा. अन्यथा दिनांक ३ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ११:०० वाजता तहसील कार्यालय श्रीगोंदा येथे न्यायासाठी आमरण उपोषणास बसणार आहे. असे निवेदन वरिष्ठ कार्यालयासह मंत्रालय, मुंबई व स्थानिक प्रशासनाला देण्यात आलेले आहे.
स्रोत:(निवेदन)
