दिनांक २ जानेवारी, श्रीगोंदा:
दोन महिन्यांपासुन कदमशहापुर, ता.गंगापुर येथुन बेपत्ता असलेली महिलेस तिच्या मुलाच्या हाती आज सोपविण्यात आले. कदमशहापुर, ता. गंगापुर, जि. औरंगाबाद येथील शांताबाई निवृत्ती चाफे ही महिला गेली दोन महिन्यापासुन बोपत्ता होती.
वाळुंज पोलीस स्टेशनमध्ये ही महिला मिसिंग असल्याची नोंद करण्यात आली होती. सर्व वृत्तपत्रात त्या पध्दतीने अनेक बातम्या प्रसिध्द करण्यात आल्या होत्या. पाहुणे, मित्र व हितचिंतक आणि घरातील सर्वजण शोध घेऊन थकले होते.

शेवटी शोध घेण्याचे थांबविण्यात आले होते. परंतु, चार दिवसापुर्वी ही महिला श्रीगोंदा तालुक्यातील शिरसगाव बोडखा येथे आढळुन आली. तिच्याशी बोलुन टप्याटप्याने माहिती घेऊन, तिचे नाव व गाव समजताच दत्ताजी जगताप यांनी खुप सारे फोन करत, त्या महिलेच्या गावातील पोलीस पाटील यांच्याशी संपर्क करताच कदमशहापुर गावात व चाफे कुटुंबात आनंदाचे वातावरण पसरले.
रात्री हरिश्चंद्र चाफे हा त्या महिलेचा मुलगा व त्यांचे नातलग येऊन, कुमार लोखंडे यांच्या घरी ती महिला त्यांचे ताब्यात देण्यात आली. वाळुंज पोलीस स्टेशनमध्ये मिसिंगची केस असल्याने, दत्ताजी जगताप यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये बेपत्ता महिला आढळुन आल्याची महिती दिल्यानंतर पोलीस डायरीमध्ये तशी नोंद करण्यात आली.
शांताबाई चाफे यांना त्यांच्या घराचा व गावाच शोध घेऊन फोन नंबर मिळविण्यात पोलीस अधिकारी, कर्मचारी, पोलीस पाटील व शिरसगाव बोडखा येथील ग्रामस्थांचे सहकार्य लाभल्याबद्दल दक्ष नागरिक फाऊंडेशनचे दत्ताजी जगताप यांनी आभार व्यक्त केले.
स्रोत:(दक्ष)
