दिनांक १६ नोव्हेंबर, श्रीगोंदा
श्रीगोंदा प्रेस क्लब या नुतन पत्रकारांच्या संघटना अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व सदस्यांचा दक्ष नागरिक फाऊंडेशनच्या वतीने सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी प्रेस क्लबचे नवनिर्वाचित (अध्यक्ष) विशाल चव्हाण, (सचिव) मिराताई शिंदे तर, (सदस्य) चंदन घोडके, राजेंद्र राऊत, सुहास कुलकर्णी, मुश्ताक पठाण आदींचा शाल, श्रीफळ व लेखणी देऊन सन्मान करण्यात आला.

दक्षचे (अध्यक्ष) दत्ताजी जगताप, जेष्ठ संचालक श्रीरंग साळवे, समीर पांढरकर, धनेश गुगळे, ललित गुगळे आदींच्या हस्ते सन्मान करण्यात आला. श्रीगोंदा प्रेस क्लबच्या वतीने सदस्य चंदन घोडके यांनी आभार मानले. सुत्रसंचालन दत्ताजी जगताप यांनी केले.
स्रोत:(दक्ष नागरिक फौंडेशन)
