दिनांक २४ डिसेंबर, श्रीगोंदा:
दिनांक २४ डिसेंबर रोजी पहाटे रस्ता ओलंडत असतांना भरधाव वेगाने जाणाऱ्या चारचाकी गाडीने एका वन्यजीवास जखमी केले. परळी ते मुंबई कडे जाणारा सिमेंटचा रस्ता झाल्याने सर्वच वाहने जास्तीत जास्त वेगाने धावत असतात. अजुन काही ठिकाणी कामे बाकी आहेत. तरी सुध्दा छोटी मोठी वाहने भरधाव वेगाने धावत आहेत. याचा फटका आज एका वन्यजीवास बसला.
दुचाकीवर प्रवास करत जाणारे जोडपे यांनी जखमी वन्यजीवास जीवाच्या अकांताने धावताना पाहिले. त्याच्या मागे कुत्रे धावत असल्याने, त्या कुत्र्यांना हाकलण्याचे काम करत होते. याच वेळेस कर्तव्यावर जाणारे वीज वितरणचे कर्मचारी सुदाम भिसे यांनी हे दृष्य पाहिले व ताबडतोब दक्ष नागरिक फाऊंडेशनचे अध्यक्ष दत्ताजी जगताप यांना फोनवर माहिती दिली. दत्ताजींनी लागलीच वन विभागाच्या वनरक्षक घोडके मॅडम यांना फोनवरुन सदर घटनेची माहिती दिली. त्यांनी इतर कर्मचाऱ्यांना माहिती दिली. तोपर्यंत रेसक्यु टिमचे कमलेश गुंजाळ घटनास्थळी पोहोचुन वन्यजीवास मदत दिली.
याकामी वायरमन सुदाम भिसे, छत्रपती शिवाजी कॉलेज कॉमर्स विभागाचे विद्यार्थी सागर तावरे, अभय कुरुमकर, अनिकेत गायकवाड, प्रसाद चव्हाण, ओंकार जाधव यांनी सहकार्य केले.
ज्या भागात वन्यजीवांचा वावर आहे त्या भागात रस्त्याच्या कडेने वन्यजीवांच्या माहितीचे बोर्ड लावावेत. जेणे करुन वाहनाचा वेग मर्यादित राहुन वन्यजीवांच्या जिवीतास धोका उत्पन्न होणार नाही. अशी मागणी दक्षचे अध्यक्ष दत्ताजी जगताप यांनी केली आहे. अशा पध्दतीचे जखमी वन्यजीव आढळल्यास तातडीने वन विभागास किंवा दक्षशी संपर्क करावा. नागरिकांनी त्या वन्यजीवाबरोबर फोटो अथवा व्हिडीओ घेऊ नयेत. परंतु मदत पोहोचेपर्यंत त्यास अभय द्यावे.! असेही दत्ताजींनी बोलताना सांगितले.
स्रोत:(प्रसिद्धी दिलेल्या माहिती नुसार)
