आ.निलेश लंके यांच्या हस्ते ‘दक्ष नागरिक फाऊंडेशन’ला “समाजभुषण” पुरस्कार..

दिनांक ३१ ऑक्टोबर, श्रीगोंदा:

केडगाव जागरुक नागरिक मंच च्या वतीने आज केडगाव येथे आमदार निलेश लंके यांच्या शुभ हस्ते कोरोना काळात जनजागृतीसाठी व लसीकरण काळात लसीकरणास मोठे सहकार्याबद्दल दक्ष नागरिक फाऊंडेशनला समाजभुषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

दक्षचे काम हे वंचित घटकांसाठी अहोरात्र सुरुच असते. कोरोना कालखंडात गावोगाव फिरत जवळपास सात जिल्ह्यात स्वत:च्या वाहनाने जाऊन कोरोनाविषयी नागरिकांमध्ये जागृती केली. करोना प्रतिबंधक लसीकरणात सुध्दा मोठे योगदान दक्षचे आहे.

देशात शंभर कोटी लसीकरण करण्यात श्रीगोंदा तालुक्याचाही मोठा वाटा आहे. या वाट्यात दक्षने सुरुवातीपासुनच सहकार्य केलेले आहे. नगर जिल्ह्यात सर्व तालुक्यामध्ये सर्वाधिक लसीकरण करण्याचा बहुमान श्रीगोंदा तालुक्याला मिळाला आहे. यामध्ये सुध्दा दक्षचा खारीचा वाटा आहे.

याचबरोबर उत्तर प्रदेशातील महिलेस घरपोहोच केले. बेवारस पुरुष महिला यांना मदत करणे, उपचारासाठी दवाखान्यात भर्ती करणे, आदी कार्य दक्ष नागरिक फाऊंडेशन करत असते. सर्वसामान्य नागरिक व भगिनींसाठी वीजेची, पिण्याच्या पाण्याची सोशल मिडियाच्या माध्यमातुन माहिती दररोज देऊन पाठपुरावा करणे.

भटकते गाई, कुत्रे आदी मुक्या प्राण्यांना मदत देण्याचे काम दक्ष निस्वार्थपणे अविरतपणे करत आहे. एक अति सामान्य असलेली दक्ष ही सामाजिक संस्था इतके कौतुकास्पद काम करत असल्याने याची दखल घेत केडगाव येथील केडगाव जागरुक नागरिक मंच ने सरदार वल्लभभाई पटेल व स्व.इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्त लोकनेते आमदार निलेश लंके यांच्या हस्ते दक्ष नागरिक फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दत्ताजी जगताप यांचा “समाज भुषण पुरस्कार २०२१” हा सामाजिक स्तरावरील पुरस्कार देऊन, गौरव केला आहे. Samajbhushan Award to Daksh Nagarik Foundation by MLA Nilesh Lanka ..

पुरस्काराबद्दल दक्षच्यावतीने दत्ताजी जगताप यांनी सर्वांचे आभार मानले. याप्रसंगी दत्ताजी जगताप, आमदार निलेश लंके, विशाल पाचारणे, जंगम सर, भोर सर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading