श्रीगोंदयातील राजकारणी या गंभीर प्रश्नी उदासीन का.? प्रकल्प पूर्ततेची आश्वासनं देऊन, दुर्लक्षित शेतकऱ्यांची मतं घशात घालणारे नेते..! निवडणूकिनंतर या विषयी पुन्हा बोलत नाहीत..!

दिनांक २ नोव्हेंबर, श्रीगोंदा:

तालुक्‍यातील दुष्काळी भागातील शेतकर्‍यांना वरदान ठरणाऱ्या “साकळाई जल सिंचन योजने”ला अनेक वर्षापासून बगल दिली जात आहे. येथील दिग्गज राजकारणी सामान्य शेतकऱ्यांच्या भावना लक्षात न घेता, ठराविक क्षेत्रात कुकडी आणि घोड या दोन सिंचन प्रकल्पाचे पाणी पोहोचवण्यासाठी आग्रही असतात.

याबाबत सविस्तर असे की, तालुक्‍यातील दुर्लक्षित राहीलेल्या “साकळाई जल सिंचन योजने”कडे सर्वसाधारण शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे. साकळाई लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांचे भवितव्य या प्रकल्पावर अवलंबून असून, त्यासाठी अनेकदा त्यांनी आंदोलने व पाठपुरावा करूनही, या योजनेला पूर्णत्वाला जाण्यास अडथळा निर्माण होत आहे. म्हणून, साकळाई सिंचन योजनेचे फक्त राजकारण होत असल्याचे ठाम मत आता येथील शेतकऱ्यांचे झाले आहे.

दुर्लक्षित शेतकर्‍यांची जिवन वाहीनी ठरणारी नमूद पाणी योजनेचे तालुक्यातील नेत्यांनी राजकारण केले, निवडणुकीपुरते साकळाई बाबत बोलले जाते, त्याविषयी आस्वस्थ केले जाते. मात्र, निवडणूक संपली की.. या प्रश्नावर कोणीही बोलायला तयार नसते.

निवडणुकांमध्ये साकळाईचे भांडवल केले जाते. असे मत यावेळी आंदोलकांनी व्यक्त केले. सर्वच पक्ष नेत्यांची यावेळी उपस्थिती होती. श्रीगोंदा, नगर तालुक्यातील कोरडवाहू जिरायती असलेल्या दुष्काळी भागात जवळपास ३५ गावांना वरदान ठरणाऱ्या या जलसिंचन योजनेच्या मागणीसाठी

दिनांक १ नोव्हेंबर रोजी हिवरे झरे (तालुका अ. नगर) या ठिकाणी आंदोलन करण्यात आले. श्रीगोंदा आणि अ. नगर तालुक्यातील राजकारणी या गंभीर प्रश्नी उदासीन का.? असा सवाल सर्वांच्या मनात उपस्थित झालेला आहे.

बाबा महाराज झेंडे, राजाराम बापू गुरुजी, (जिल्हा परिषद सदस्य) बाळासाहेब हराळ, (बाजार समितीचे सभापती) अभिलाष घिगे, (उपसभापती) संतोष मस्के, रवींद्र कडूस, रेवनाथ चोभे, ज्ञानदेव भोसले, सुरेश काटे, राजेंद्र झेंडे, डॉक्टर खाकाळ, सोमनाथ घाडगे, प्रताप नलगे, Why are the politicians in Shrigonda indifferent to this serious question? Leaders who swallow the votes of neglected farmers by promising to complete the project ..! They are not talking about this again after the election ..!

रोहिदास उदमले, संतोष लगड, आदिनाथ झेंडे, सुनील खेंगटे, अण्णा चोभे, रामदास झेंडे, एडवोकेट अनुजा कोकाटे, ज्ञानदेव कवडे, भाऊसाहेब काळे, संजय गिरवले, राजेंद्र मस्के, संजय धामणे, दादा दरेकर, झुंबरराव बोरुडे सह कार्यकर्ते, पदाधिकारी व येथील वंचीत शेतकरी उपस्थित होते.

स्रोत:(ऑनलाईन वृत्त)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading