दिनांक २ नोव्हेंबर, श्रीगोंदा:
तालुक्यातील हिंगणी दुमाला येथील रहिवासी असलेल्या शशिकांत गुंजाळ या युवकाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत, शिक्षण पूर्ण करून, वैमानिक होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. स्वतःच्या आईने शशिकांतचे वडील सोबत नसताना अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून अगदी साधारण परिस्थितीत हा संघर्ष पूर्ण केला. त्यांचा संबंध श्रीगोंदा तालुक्यासह जिल्ह्याला अभिमान आहे. असे गौरवोद्गार अनेकांनी यावेळी त्यांचा सन्मान करताना काढले आहेत.

शशिकांत गुंजाळ हे वैमानिक झाल्याची वार्ता समजल्यानंतर तालुक्याचे तहसीलदार मिलिंद कुलथे तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व सामाजिक प्रक्रियेत सक्रिय असलेले तालुक्याचे नेते घनश्याम अण्णा शेलार, (सहाय्यक पोलीस उप निरीक्षक) अनिल भारती, ऑल इंडिया पँथर सेनेचे (जिल्हा उपाध्यक्ष) अमर घोडके, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आठवले गटाचे (जिल्हा उपाध्यक्ष) अवि घोडके यांनी यावेळी शशिकांतचा सन्मान करत, पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या माध्यमांतुन शशिकांतचा सन्मान करण्यात आला. यावेळी (जिल्हा उपाध्यक्ष) अविनाश घोडके, (शहराध्यक्ष) विशाल घोडके, श्रीकांत दादा घोडके सह पदाधिकारी उपस्थित होते.

घनश्याम आण्णा शेलार यांच्या संपर्क कार्यालय मध्ये शशिकांतचा सत्कार करण्यात आला. यावेळी घनश्याम आण्णा शेलार, राष्ट्रवादीचे (तालुकाध्यक्ष) हरिदास शिर्के, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे (तालुकाध्यक्ष) संदीप उमाप, मुकुंद सोनटक्के सह राष्ट्रवादीचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

श्रीगोंदाचे तहसीलदार मिलिंद कुलथे यांनीही शशिकांत गुंजाळ यांचा सत्कार केला व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. आईने केलेल्या संघर्षाचे प्रतीक असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. Honoring pilot Shashikant Gunjal in Shrigonda ..

याचबरोबर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ज्येष्ठ (पदाधिकारी) जीवाजी घोडके, ऑल इंडिया पँथर (सेनेचे) अमर घोडके, मातंग युवक (संघटनेचे) नंदूभाऊ ससाने, पत्रकार अमोल बोरगे, पत्रकार मुस्ताक पठाण यांनीही यावेळी शशिकांत गुंजाळ यांना सदिच्छा व्यक्त करून, पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
स्रोत:(सत्कार कार्यक्रम)
