या संघटनेने केली २ कोटींची मागणी..!

दिनांक २ नोव्हेंबर, श्रीगोंदा:

तालुक्यातील सामाजिक/ राजकीय क्षेत्रात अग्रणी असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) या संघटनेने श्रीगोंदा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी दोन कोटी रुपयांच्या निधीची मागणी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे नुकतीच केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्रवासादरम्यान श्रीगोंद्यात आले होते. ते थांबलेल्या ठिकाणाची आठवण म्हणून, विविध संघटनांच्या पाठपुराव्यानंतर श्रीगोंदा नगरपालिकेमार्फत भव्य स्मारक उभारण्यात आले आहे.

मात्र, या स्मारकाचे बरेच काम अजून शिल्लक असून, यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या जिल्हा उपाध्यक्ष अविनाश घोडके यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी व स्थानिक (नगरसेवक) सोनाली ताई हृदय घोडके, (नगरसेवक) निसार बेपारी व (नगरसेवक) समीर बोरा यांनी धनंजय मुंडे (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री महाराष्ट्र राज्य) यांना भेटून निवेदन देत, निधीची मागणी केली आहे.

दिनांक ३० ऑक्टोबर २१ रोजी एका कार्यक्रमानिमित्त धनंजय मुंडे हे श्रीगोंदयात आले असता, त्यांची नमूद ठिकाणी भेट घेऊन, पदाधिकाऱ्यांनी मंत्री महोदयांना याबाबतचे निवेदन सादर केले आहे. निवेदनात नमूद केले आहे की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, श्रीगोंदा येथील स्मारकाच्या उर्वरित कामांसाठी लागणारा निधी सामाजिक मंत्रालयाकडून उपलब्ध व्हावा. असे निवेदनात म्हटले आहे.

नमूद निवेदन सादर करतांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ज्येष्ठ पदाधिकारी गौतम आण्णा घोडके, (जिल्हा उपाध्यक्ष) अविनाश भाऊ घोडके, (शहराध्यक्ष) विशाल घोडके, (नगरसेवक) निसार भाई बेपारी, (नगरसेवक) समीर बोरा, श्रीकांत (दादा) घोडके सह पदाधिकारी उपस्थित होते.

स्रोत:(निवेदन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading