शिवसेनेची पेट्रोल, डिझेल दरवाढ निषेधार्थ सायकलं रॅली..!

दिनांक ३१ ऑक्टोबर, श्रीगोंदा:

युवा सेना (प्रमुख) आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने युवसेना (सचिव) वरूणजी सरदेसाई, शिवसेना (संपर्कप्रमुख) भाऊ कोरगावकर, शिवसेना (जिल्हाप्रमुख) शशिकांत गाडे, युवासेना (संपर्कप्रमुख) संजय साटम, युवासेना (जिल्हाप्रमुख) रविंद्र वाकळे यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना (तालुकाप्रमुख) बाळासाहेब दुतारे यांच्या नेतृत्वाखाली श्रीगोंदा तालुक्यामध्ये पेट्रोल दरवाढ विरोधात सायकल रॅली काढून, निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच, गॅस दरवाढीच्या विरोधात शिवसेना महिला आघाडीच्या वतीने चुलीवर भाकरी थापून निषेध व्यक्त करण्यात आला.

सविस्तर वृत्त असे की, पेट्रोल आणि डिझेल या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे हाल बेहाल होत चाललेले असतांना, रोज होणारी इंधन वाढ सामान्य नागरिकांना परवडणारी नसून, वाहनं वापरण्याऐवजी सायकलवर प्रवास करण्याची वेळ आता देशातील नागरिकांवर येऊन ठेपली आहे. या सर्व प्रक्रियेच्या विरोधात व केंद्र सरकारच्या वतीने निर्धारित करण्यात आलेल्या पेट्रोल, डिझेल इंधन दरवाढ निषेधार्थ आंदोलकांनी सायकलं रॅली काढत, जोरदार घोषणाबाजी केली. इंधन दर कमी न झाल्यास..! येणाऱ्या काळामध्ये तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल.! अशा इशारा यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख बाळासाहेब दूतारे यांनी दिला.

पेट्रोल, डिझेल इंधन दरवाढ व केंद्र सरकारच्या या धोरणा विरोधात संबंध राज्यभर शिवसेना, युवासेनेच्या वतीने आज दिनांक ३१ ऑक्टोबर २१ वार रविवार रोजी आंदोलन करण्यात आले. Shiv Sena’s bicycle rally to protest petrol, diesel price hike ..!

यावेळी महिला आघाडी (तालुकाप्रमुख) मनिषा ताई काळे, चोराची वाडी ग्रामपंचायत सदस्य निलेश साळुंखे, संतोष खेतमाळीस, सुरेश देशमुख, गोपीनाथ गोंडे, जयराज गोरे, ओमकार शिंदे, राजू तोरडे, सुनील शिंदे, नितीन शिंदे, बापू युवराज, सांवत बापु मस्के, श्रीराम मस्के, शरद नागवडे, भीमराव तुले, कृष्ण भालेराव, हरिभाऊ काळे, नूतन पानसरे, गायकवाड मॅडम, अतुल दरेकर, रोहन मोरे, राहुल नवले सह मोठ्या संख्येने शिवसैनिक व युवासैनिक, महिला आघाडी या निषेध आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading