RTO च्या अड्यात परवाना देण्यासाठी वापलेली गड्डी विना नंबर प्लेटची…! श्रीगोंदा कॅम्प मधील प्रकार..

दिनांक १६ नोव्हेंबर, श्रीगोंदा:

एरवी सर्वसामान्य वाहन चालक, वाहनधारकांना नियमांच्या चौकटीत अडकवून त्यांच्यावर कारवाई करणाऱ्या प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनाच नियमांचा विसर पडल्याचे आज श्रीगोंद्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहावर दिसून आले.

वाहन परवाना(ड्रायव्हिंग लायसन)देण्यासाठी आज श्रीगोंदा शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात नगर R.T.O चा कॅम्प होता. यावेळी त्याठिकाणी वाहन चालवण्याचा परवाना देण्याआधी ज्या व्यक्तीला हा परवाना द्यायचा त्याला वाहन चालवता येते की नाही. त्याला वाहन चालवण्याच्या नियमांची माहिती आहे की नाही. याची परिवहन अधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात येत होती.

परंतु, यावेळी वाहन चालवता येते की नाही. ही पाहणी ज्या वाहनातून केली जात होती. त्या वाहनालाच नंबर नव्हता. बिगर क्रमांकाच्या वाहनातून ही गाडी चालवण्याची ट्रायल घेण्यात येत होती.

नगर येथील प्रादेशिक परिवहन अधिकारी आयशा शेख यांच्या समोरच हे सर्व सुरू होते. या प्रकाराची एक व्यक्ती आपल्या मोबाईल मध्ये छायाचित्रण करत असतांना, परिवहन अधिकारी आयशा शेख यांनी त्या व्यक्तीचा मोबाईल जप्त करत, त्याला पोलीस स्टेशनची धमकी दिल्याचे समजते आहे.

परंतु वाहाने व वाहतुकी संबंधी नियमांचे पालन करण्यासाठी R.T.O विभाग कार्यरत असतो. परंतु, आज मात्र, या परिवहन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच बिगर क्रमांकाच्या वाहनातून अश्या प्रकारे वाहन चालवता येते की नाही.? याचे परीक्षण करण्यात आल्यामुळे उपस्थित लोकांमध्ये याची चांगलीच चर्चा रंगली होती.

कायद्याचा धाक दाखवत नियमांवर बोट ठेवणाऱ्या या परिवहन अधिकाऱ्यांनाच नियमांचा विसर पडल्याचे चित्र आज पाहायला मिळाले. Gaddy without number plate used for licensing in RTO’s base …!

स्रोत:(मिळालेल्या माहितीनुसार)

(अड्डयात म्हणजे कार्यक्षेत्रात व गड्डी म्हणजे गाडी असा नमूद शब्दांचा अर्थ वापरावा)..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading