“श्रीगोंदा प्रेस क्लब” च्या तालुकाध्यक्ष पदी विशाल चव्हाण तर, उपाध्यक्ष पदी विजय उंडे यांची बिनविरोध निवड…

दिनांक १६ नोव्हेंबर, श्रीगोंदा:

दैनिक नवराष्ट्र वृत्तपत्र व प्रशासक या न्यूज पोर्टलच्या माध्यमांतून सर्वसामान्य, उपेक्षित, वंचित, कष्टकरी, शेतकऱ्यांसह कामगारांच्या व्यथा मांडणारे पत्रकार तथा संपादक विशाल चव्हाण यांची “श्रीगोंदा प्रेस क्लब”च्या तालुकाध्यक्ष पदी तर, वीर भूमि वृत्तपत्राचे निर्भीड पत्रकार विजय उंडे यांची तालुका उपाध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

याबाबत शहरातील सार्वजनिक बांधकाम उप विभागाच्या विश्रामगृहावर बैठक संपन्न झाली. राष्ट्रीय पत्रकार दिनाचे औचित्य साधत संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. जनकल्याणाची कामे, सर्वसमावेशक लिखाण व सामान्यांना न्याय देण्याचे प्रथम उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवत, सुशिक्षित, अनुभवी आणि स्वतः वार्तांकन करून बातमी तयार करू शकणारेच पदाधिकारी यात सामील करण्यात आले आहेत.

वृत्तपत्र प्रतिनिधी, युट्यूब, पोर्टल व इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे पदाधिकारी यांचा यात समावेश आहे. अन्वयार्थ, वास्तववादी आणि सातत्यपूर्ण पत्रकारिता करून, सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देणे. हे संघटनेचे सकारात्मक उद्दिष्ट असून, येणाऱ्या कालखंडात संघटना गतिमान करण्याची जिम्मेदारी सर्वांनी स्वीकारली आहे. तर, नवीन अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्या सूचनेनुसार संघटनेची पुढील दिशा ठरणार आहे.

या बैठकीत जेष्ठ पत्रकार व दैनिक सकाळचे तालुका प्रतिनिधी संजय काटे यांची मार्गदर्शक, (तालुकाध्यक्ष पदी) विशाल चव्हाण, (उपाध्यक्ष पदी) विजय उंडे, (सचिव) मीरा शिंदे, (कार्याध्यक्ष) मुश्ताक पठाण, (संघटक) चंदन घोडके, (प्रवक्ता) राजेंद्र राऊत तर, (सदस्य पदी) शरद शिंदे, अमर छत्तीशे, गणेश गाडेकर, सुहास कुलकर्णी, आप्पा चव्हाण, नाना जठार, भीमराव उल्हारे, अमोल बोरगे यांची निवड करण्यात आली आहे.

नूतन अध्यक्ष व सदस्य निवडीबद्दल सर्व स्तरांतून सदिच्छा व्यक्त होत, पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत. Vishal Chavan as the taluka president of “Shrigonda Press Club” and Vijay Unde as the vice president without any objection.

स्त्रोत:(आयोजित बैठक)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading