दारूबंदीची तक्रार द्यायला गेले.. अनं, श्रीगोंदा पोलीसच दारू पिऊन ड्युटीवर.?

दिनांक १६ नोव्हेंबर, श्रीगोंदा:

श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे काही कर्मचारी मद्यधुंद अवस्थेत कर्तव्यावर येत असल्याचे यापूर्वीही निदर्शनास आलेले आहे. याचाच प्रत्यय शिवसेना श्रीगोंदा तालुकाध्यक्ष बाळासाहेब दुतारे यांना आला आहे.

एका प्रकरणाच्या निमित्ताने दूतारे श्रीगोंदा पोलीस स्टेशनला गेले असता, एक मद्यधुंद अवस्थेतील कर्मचारी थेट ठाणे अंमलदाराच्या खुर्चीत बसलेला दिसला. अनधिकृत दारूविक्रीवर कारवाई करा अशी तक्रार करण्यासाठी गेलेल्या बाळासाहेब दूतारे यांची तक्रार घेणाराही दारू पिलेला असल्याने, तक्रार देण्याबाबत दूतारे यांना संभ्रम निर्माण झाला. धाडस करून, त्यांनी दारूबंदीचा प्रकार त्यांना सांगितला. मात्र, दारू पिलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने उलट दुतारे यांनाच भाषण द्यायला सुरुवात केली. उलट, सुलट बोलून त्यांच्याशी हुज्जत घालू लागला.

या प्रकारनंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षक श्रीगोंदा यांना निवेदन सादर करून, नमूद पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाईची मागणी केली आहे. दिलेल्या निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, शिवसेनेच्या श्रीगोंदा तालुका प्रमुखाला पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्याने गैरवर्तन करत, अर्वाच्च भाषेत दमबाजी केली आहे.

तालुक्यातील पेडगाव येथे बेकायदेशीर दारू व्यवसाय चालू आहेत, परिसरातील नागरिकांना व महिलांना काही लोकं दारू पिऊन त्रास देत असल्याबाबत शिवसेना महिला तालुकाप्रमुख श्रीमती मनीषा काळे ताई यांना पेडगाव येथील पीडित महिलांनी फोन करून, परस्थिती पाहण्यास बोलावले. त्या घटनास्थळी गेल्या, परिस्थिती गंभीर होती, दारू पिणारी व बेकायदेशीर दारू विकणारी लोकं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आढळले.

काळे ताई व त्यांच्या सोबत गेलेल्या महिलांनी बेकायदेशीर दारू विकणाऱ्या महिलांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु, मद्यधुंद व्यक्ती व दारू विकणाऱ्या महिलांनी काळे ताईनां दमबाजी करून, अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. येथून परत कशी जाते.. तेच पाहतो.. तुला काय दारू बंद करायचा ठेका दिलायं का..? असे म्हणून, त्यांनी तेथे काही गुंड प्रवृत्तीचे लोकं जमा केली. त्यांच्याशी गैरवर्तन केलेबाबत निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

घडलेल्या घटनेनंतर तालुका प्रमुख बाळासाहेब दूतारे यांना महिला पदाधिकार्‍यांनी फोन करून, घडलेला प्रकार सांगितला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये..! म्हणून, बाळासाहेब दुतारे हे १४ नोव्हेंबर २१ रोजी ८:३० च्या सुमारास श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यासाठी गेले. दुतारे यांनी नमूद केल्याप्रमाणे कर्तव्यावर असणारे पोलीस कर्मचारी ठाणे अंमलदार श्री. वैराळ यांनी बाळासाहेब दुतारे यांच्याशी अरेरावीची भाषा केली. तुला काय करायचे.? मी तुला ओळखत नाही.. दारू विक्रेत्यांचा आम्हाला हप्ता चालू आहे. चल येथून चालता हो.! तुझी तक्रार नोंद होणार नाही. असे म्हणून, तक्रार नोंदवून घेण्यास नकार देऊन, शिवसैनिकांना तेथून हुसकावून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. यावेळी वैराळ हे मद्यधुंद अवस्थेत होते.

शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाळासाहेब दूतारे यांनी माध्यमांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. की, श्रीगोंदा तालुक्यात बऱ्याच ठिकाणी बेकायदेशीर व्यवसाय चालू असून, दारूविक्री पोलिसांच्या आशीर्वादाने चालू आहे. श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे कर्मचारी ठाणे अंमलदार श्री. वैराळ यांची त्वरित याप्रकरणी चौकशी व वैद्यकीय तपासणी करून, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी. अन्यथा.. श्रीगोंदा तालुका शिवसेनेच्या वतीने त्यांच्याविरोधात आमरण उपोषण करण्यात येईल. तसेच, होणाऱ्या परिणामांस सर्वस्वी पोलीस निरीक्षक श्रीगोंदा जबाबदार राहतील. असे निवेदन हरिभाऊ काळे, सुरेश देशमुख, निलेश गोरे, राजू तोरडे, श्रीमती मनीषा ताई काळे, शिवाजी दांगडे, जयराज गोरे सह पदाधिकाऱ्यांनी दिले आहे. Went to report alcohol ban .. Anam, Shrigonda police on duty after drinking alcohol ..?

निवेदनाच्या प्रती (मुख्यमंत्री) उद्धवजी ठाकरे, दिलीप वळसे (गृहमंत्री महाराष्ट्र), शंभूराजे देसाई (गृह राज्यमंत्री महाराष्ट्र), (पोलीस अधीक्षक, अहमदनगर) मनोज पाटील व (तहसीलदार श्रीगोंदा) मिलिंद कुलथे यांना देण्यात आल्या आहेत.

स्त्रोत: (निवेदन)

बातमीसाठी प्रतिकात्मक फोटोचा वापर करण्यात आला आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading