मागासवर्गीयांच्या जागेवर डोळा ठेऊन, स्व:हित साधण्याच्या प्रकार अधिकाऱ्यांनी थांबवावा.. अन्यथा..!

दिनांक १५ नोव्हेंबर,श्रीगोंदा:

तालुक्यातील उक्कडगाव या ठिकाणी मातंग वस्तीमध्ये राखीव असणाऱ्या मोकळ्या जागेत ग्रामपंचायतमार्फत ठराविक लोकांच्या फायद्यासाठी बांधण्यात येणाऱ्या गाळ्यांचे काम त्वरित थांबवावे. अन्यथा..? आंदोलन करण्यात येईल. असे निवेदन लहुजी शक्ती सेना, श्रीगोंदा यांनी गटविकास अधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांना नुकतेच दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, दलित वस्तीमध्ये मातंग समाजाच्या समाजिक कार्यक्रमासाठी राखीव असलेल्या, जागेमध्ये ग्रामपंचापत उक्कडगाव यांनी व्यापारी संकुल बांधण्याचे काम सुरु केले आहे.

मागासवर्गीय, वंचीत घटकांना घरकुलासाठी, समाजिक सभागृह, समाजमंदीर अथवा इतर सामाजिक कार्यक्रमासाठी अनेक कालखंडापासून उपयोगात असणाऱ्या या जागेमध्ये समाजाचे विवाह सोहळे, महापुरुषांच्या जयंती, गणपती उत्सव, नवरात्र होत असतांना. काही लोकांच्या व समाज कंटकांच्या स्वतःहीतासाठी त्या जागेत गाळयाचे कामे चालु करण्यात आले आहे. त्या गाळयांना येथील मांतग बांधवांचा विरोध असुन, नमूद काम त्वरीत बंद करण्यात यावे. अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

तसेच, गाळे खरेदी करण्यासाठी गाळयाचे डिपॉझीट लाखो रुपये असून, ही रक्कम येथील मांतग बांधव भरू शकत नाहीत. सदरील गाळे मांतग वस्तीमध्ये असतांना, समाजाच्या कोणत्याच व्यक्तीला या गाळयाचा लाभ मिळू शकनार नाही.

यामुळे मागासवर्गीयांच्या जागेवर डोळा ठेऊन हित साधण्याच्या प्रकार जबाबदार अधिकाऱ्यांनी चौकशी करुन, थांबवावा. अन्यथा.. समाज बांधव, लहुजी शक्ती सेनासह तालुक्यातील दलित संघटना याप्रकरणी तीव्र आंदोलन करतील. यांची सर्वस्वी जिम्मेदरी जबाबदार अधिकाऱ्यांची राहील. By keeping an eye on the place of backward classes, the authorities should stop the practice of self-interest .. otherwise ..!

सदरचे बांधकाम त्वरीत थांबवावे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काम थांबवण्यासाठी दिलेल्या आदेशाची प्रत किंवा आंदोलकांना लेखी आश्वासन द्यावे. अन्यथा..! लहुजी शक्ती सेनाच्या वतीने आज दिनांक १५ नोव्हेंबर २०२१ रोजी तहसिल कार्यालय श्रीगोंदा समोर धरणे आंदोलन करण्यात येईल, याची नोंद घ्यावी. असे निवेदन सादर करण्यात आले आहे.

स्रोत:(निवेदन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading