“श्रीगोंदा प्रेस क्लब”च्या नूतन पदाधिकाऱ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव..

दिनांक १६ नोव्हेंबर, श्रीगोंदा:

श्रीगोंदा प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी पत्रकार विशाल चव्हाण यांची तर, उपाध्यक्षपदी विजय उंडे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. मंगळवार दिनांक १६ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय पत्रकार दिनाचे औचित्य साधून श्रीगोंदा बांधकाम उपविभागीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत या निवडी करण्यात आल्या. Congratulations to the new office bearers of “Shrigonda Press Club”.

यावेळी प्रेस क्लबचे मार्गदर्शक संजयराव काटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रेस क्लबची स्थापना करून, सर्व निवडी खेळीमेळीत पार पडल्या. सचिवपदी मीरा शिंदे, कार्याध्यक्षपदी मुश्ताक पठाण व संघटकपदी चंदन घोडके व प्रेस क्लबचे प्रवक्ते म्हणून, राजेंद्र राऊत यांची निवड करण्यात आली आहे.

या बैठकीला शरद शिंदे, अमर छत्तीसे, सुहास कुलकर्णी, आप्पासाहेब चव्हाण, गणेश गाडेकर, अमोल बोरगे, नानासाहेब जठार, भीमराव उल्हारे यांची संस्थापक सदस्यपदी निवड करण्यात आली.

प्रेस क्लबच्या माध्यमातून गोरगरीब, सर्वसामान्य जनतेला लेखणीच्या रूपाने न्याय मिळवून देणे, सामाजिक, राजकीय प्रश्नांना वाचा फोडणे, प्रशासकीय कल्याणकारी योजना पारदर्शकपणे जनतेला पोहोचवण्यासाठी संघर्ष करून, शोध पत्रकारितेचा आविष्कार जपणे, पत्रकारांचे प्रश्न सोडविणे, या कामांवर भर देण्यात येणार आहे.

नूतन पदाधिकारी व संघटनेचे, (आमदार) बबनराव पाचपुते, (माजी आमदार) राहुलदादा जगताप, नागवडे कारखान्याचे (अध्यक्ष) राजेंद्र नागवडे, जिल्हा परिषदेचे माजी (अध्यक्ष) बाबासाहेब भोस, (तहसीलदार) मिलिंद कुलथे, जिल्हा बँकेच्या (संचालिका) अनुराधा नागवडे, (गटविकास अधिकारी) गोरख शेलार, (पोलिस निरीक्षक) रामराव ढिकले, ()ऑल इंडिया पँथर सेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(A), बहुजन समाज पार्टी, सुनिल ओहोळ, अमर घोडके, हृदय (दादा) घोडके, अविनाश घोडके, दक्ष नागरिक फौंडेशन, धनेश गुगळे, दत्ताजी जगताप, श्रीरंग साळवे, जेष्ठ पत्रकार बाळासाहेब बळे, अरीफ शेख, उत्तमराव राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे (तालुकाध्यक्ष) हरिदास शिर्के, राजेंद्र मस्के, संदीप उमाप, (शिवसेना तालुकाप्रमुख) बाळासाहेब दूतारे, शिवसेनेचे हरिभाऊ काळे, (पत्रकार) बाळासाहेब काकडे, गणेश कविटकर आदींनी अभिनंदन केले आहे.

स्रोत:(शुभेच्छा संदेश)

Leave a Reply