दिनांक १६ नोव्हेंबर, श्रीगोंदा:
कोळगाव येथील “रक्षक फाउंडेशन” यांनी आयोजित केलेले शेतकरी मित्रांसाठी मोफत शेळी, गाय, कोंबडी व इतर प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. त्यात सहभागी झालेल्या शेतकरी पुरुष व महिलांना प्रशिक्षण देण्यात आले.

यावेळी आयोजकांनी आलेल्या शेतकऱ्यांना योग्य रित्या व्यवस्था करण्यात आली. विजयकुमार राधाकृष्ण तोरपे पशुधन विकास अधिकारी यांचे येथे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. त्याच प्रमाणे अध्यक्ष गणेश गाडेकर यांनी शासकीय योजना व व्यवसायिक कर्ज याबद्दल मार्गदर्शन केले.

शेकऱ्यांच्या प्रश्नावर डॉ तोरपे यांनी उत्तरे देत शेतकऱ्यांना प्रगतिवर कसे नेता येईल व त्यांचा फायदा कसा होईल.? हे सांगितले. शेती पूरक व्यवसाय व औद्योगिक व्यवसाय प्रशिक्षण हवे असल्यास आमच्याशी संपर्क करावे. असे आवाहन अध्यक्ष गणेश गाडेकर यांनी केले आहे. Rakshak Foundation Kolgaon provides free training to farmers.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
