गोंधळलेले BDO, संभ्रमित ग्रामसेवक, शासनाचे आदेश कोणी जुमानेना.! श्रीगोंदा पंचायत समितीचा कारभार रामभरोसे..?

दिनांक १७ नोव्हेंबर, श्रीगोंदा:

श्रीगोंदा पंचायत समितीचा कारभार सुसूत्रता आणि नियमांत चालत नसल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे. नव्याने रुजू झालेले BDO गोरख शेलार हे अकार्यक्षम पद्धतीने काम करत आहेत. संपूर्णतः गोंधळलेल्या परिस्थितीत हा अधिकारी प्रशासकीय कारभार पाहत आहे. त्यांनी दिलेले निर्णय व आदेश कनिष्ठ कर्मचारी व प्रशासनातील पदाधिकाऱ्यांना मान्य नाहीत. एकंदरीत श्रीगोंदा पंचायत समितीचा सर्व कारभार रामभरोसे चालत असल्याचे चित्र आता निर्माण झाले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, श्रीगोंदा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शेलार यांनी नव्यानेच पंचायत समितीचा पदभार स्वीकारला आहे. कर्तव्यावर रुजू झाल्यापासून त्यांच्या कारभारावर अनेकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलेले आहेत. कामं होत नाहीत.. कनिष्ठ कर्मचारी, पदाधिकारी, ग्रामसेवक हे BDO साहेबांचे म्हणणे ऐकून घेत नाहीत.. साहेबांनी दिलेले आदेशही कर्मचाऱ्यांना किंवा ग्रामसेवकांना पचत नाहीत.. त्यामुळे कासवाच्या गतीने चाललेली ही जनकल्याणाची कामं आता, गोगलगायीच्या चालीने सुरू झाली आहेत.

शासन निर्णयाच्या अनुषंगाने करण्यात येणारी जनकल्याणाची कामंही येथे पूर्ण केली जात नाहीत. विशेषत: जीआरच्या अनुषंगाने काम होत नाहीत म्हणून, तहसीलच्या प्रांगणामध्ये पीडितांनी आंदोलने केली. पाठपुरावा केला. वंचित, उपेक्षित घटकांनी आग्रह केला. तरीही BDO साहेबांना पुढे काय करायचे..? हे काय सुचायला तयार नाही..!

SC, ST, VJNT या दुर्लक्षित घटकांच्या रहिवासाचा प्रश्न नियमाकुल करण्याबाबत मागील महिन्यात बहुजन समाज पार्टीच्या माध्यमांतून घेण्यात आलेल्या आंदोलनासाठी उपस्थित असलेल्या तालुक्यातील शेकडो पीडितांना त्यांच्या अतिक्रमित जागा नियमाकुल करण्यासाठी श्रीगोंद्याचे तहसीलदार मिलिंद कुलथे व गट विकास अधिकारी गोरख शेलार यांनी आंदोलन स्थगितीबाबत आश्वासन दिले. Confused BDO, confused Gram Sevak, no one obeys the orders of the government! Rambharose is in charge of Shrigonda Panchayat Samiti ..?

मात्र, संपूर्ण बाबींची पूर्तता करूनही, महिन्याचा कालावधी उलटला तरीही, दिलेले आश्वासन पाळले जात नाही. म्हणून, दोन दिवसांपूर्वी गट विकास अधिकारी साहेबांच्या दलात बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी सुनिल ओहोळ पीडितांना घेऊन आले होते. परंतु, साहेब काय त्यांचे प्रश्न समजून घ्यायला तयार नव्हते. आंदोलन केले त्यादिवशी आंदोलकांना, आंदोलन मागे घेण्यासाठी विनंती करणारे BDO साहेब त्यांच्याच तंद्रीत दिसत होते.

गोड बोलून संविधानिक अधिकारांपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न हे अधिकारीवर्ग करतात. मात्र, त्यांच्या कर्तव्याची वेळ आली की, ते त्यापासून दूर पळतात. अशी परिस्थिती या प्रकरणातून समोर आली आहे. विरोधाच्या घेऱ्यात लटकलेल्या SC, ST, VJNT ची अतिक्रमनं नियमाकुल करण्याच्या विषयावर स्थानिक प्रशासकीय यंत्रणा उदासीन असल्याने, पुन्हा एकदा आंदोलनाचे संविधानिक हत्यार काढून, सत्याग्रह करण्याची वेळ आमच्यावर आली असल्याचे मत बहुजन समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी सुनिल ओहोळ यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत नमूद केले आहे.

स्रोत:(मिळालेल्या माहितीनुसार)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading