ॲट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल करणाऱ्यावर कारवाईसाठी उपोषण..

दिनांक १ जानेवारी, श्रीगोंदा:

तालुक्यातील भावडी येथील मुक्ताबाई नामदेव शिंदे या महिलेने खोटा अट्रोसिटी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याची सीसीटी फुटेज तपासानी करून सखोल चौकशी करावी व खोटा गुन्हा दाखल करणाऱ्यावर कारवाई करावी या मागणीसाठी उपसरपंच यांच्या सह ग्रामस्थांनी तहसील कार्यालयासमोर काल दिनांक ३१ डिसेंबर २१ रोजी केले उपोषण आहे.

तालुक्यातील भावडी येथे दिनांक २३ डिसबेर २१ रोजी ग्रामपंचायत ची मासिक सभा संपल्यावर बाहेर येत असताना सरपंच धनश्री करनोर व उपसरपंच कमल छत्तीसे या गेटच्या बाहेर पडताच, विरोधी गटाच्या महिलांनी सरपंच धनश्री करनोर यांना खाली पाडून मारहाण करत असताना सरपंच यांना वाचविण्यासाठी उपसरपंच कमल छत्तीसे या मध्ये पडल्या व मारहाण करू नका. म्हणताच विरोधी गटाच्या महिलांनी व पुरुषांनी छत्तीसे यांनाही धक्काबुक्की करत जातिवाचक शिवीगाळ केली.

याबाबत उपसरपंच छत्तीसे यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दिनांक २३ डिसेंबर २१ रोजी गुन्हा दाखल केला. छत्तीसे यांनी गुन्हा दाखल करताच विरोधी गटाचे शहाजी रामचंद्र कोरडकर व ईतर काही व्यक्तिंनी मागासवर्गीय समाजातील मुक्ताबाई नामदेव शिंदे यांना पोलीस स्टेशनला बोलावून आत्माराम बन्सीलाल भोस, कल्याण कांतीलाल भोस, विठ्ठल रंगनाथ भोस, शहाजी दादासाहेब भोस, देवीदास आप्पासाहेब कोरडकर, यांचा काहीही संबंध नसताना, राजकिय सुडापोटी अट्रोसिटीचा खोटा गुन्हा दाखल केला.

मात्र, गुन्हा दाखल केल्यानंतर भावडी गावातील ग्रामस्थ संतप्त होऊन, ग्रामस्थांनी दिनांक ३१ डिसेंबर रोजी श्रीगोंदे तहसील कार्यालयासमोर खोटा गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ आमरण उपोषण केले.

खोटा गुन्हा दाखल केलेल्या मुक्ताबाई नामदेव शिंदे फिर्यादी मध्ये सांगतात की, सकाळी ११.३० वाजता घटना घडली तर, मग रात्री ११.४० वाजता म्हणजे तब्बल बारा तासांनी उशिरा गुन्हा का दाखल केला.? या सदर घटना घडल्यापासून सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासावे म्हणजे, या प्रकरणातील सत्य बाहेर येईल.

परंतु, गुन्हा दाखल केल्यानंतर भावडी गावातील ग्रामस्थ संतप्त होऊन ग्रामस्थांनी दिनांक ३१ डिसेंबर रोजी श्रीगोंदे तहसील कार्यालयासमोर हा गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ आमरण उपोषण केले. ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करणार्‍या मुक्ताबाई नामदेव शिंदे व त्यांना गुन्हा दाखल करण्यास भाग पडणार्‍या व्यक्तिंची सखोल चौकशी करून, कारवाई करण्यात यावी.

या मागणीसाठी शांतीलाल भोस, अँड सुनील भोस, लक्ष्मण कोरडकर, गुलाब शिंदे, दत्तात्रय शिंदे, सुनील सर्जेराव भोस, संजय करनोर, महेंद्र भोस, प्रभू कोरडकर, गोवर्धन भोसले, अशोक बाळू शिंदे, उत्तम लांडगे, सखाराम पांडूळे, हौसाबाई शिंदे व ईतर ग्रामस्थ यांनी श्रीगोंदा तहसील कार्यालया समोर आमरण उपोषण केले.

स्रोत:(उपोषण)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading