श्रीगोंदयात शुल्लक कारणावरून दोघा भावांवर चाकूने हल्ला..

दिनांक १ जानेवारी, श्रीगोंदा:

तालुक्यातील ढोरजा येथे छोट्या टपरीवर वडापाव खाऊन निघालेल्या इसमाला पैसे मागितल्याचा राग आला. आणि त्याने टपरी चालकास चाकूने मारहाण करत, हे भांडण सोडवण्यासाठी मध्ये आलेल्या टपरी चालकाच्या भावावरही प्राणघातक हल्ला केला आहे. त्यात दोघेही गंभीर जखमी झाले आहेत.

या घटनेनंतर बेलवंडी पोलीस ठाण्यात चार जणांवर भादवि कलम ३०७, ३२६, ३२३, ५०४, ५०६, ३४ सह अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ३(१)(r)(s), ३(२)(va), ३(२)(v) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, दिनांक २९ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी ४:०० वाजता ढोरजा येथील प्रवीण झुंबर पारधे या इसमाच्या चहा टपरीवर सचिन ज्ञानदेव धोत्रे व गोट्या ज्ञानदेव धोत्रे हे दोघे वडापाव खाण्यासाठी आले होते. वडापाव खाल्ल्यानंतर तेथून विना पैसे देताच ते निघून चालले असता, प्रवीणने या दोघांना वडापावचे पैसे मागितले या कारणावरून, सचिन व गोट्या यांनी प्रविनला जातीवाचक शिवीगाळ करुन तुझ्याकडे पाहून घेतो म्हणत निघून गेले.

त्यानंतर संध्याकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास सचिन ज्ञानदेव धोत्रे, गोट्या ज्ञानदेव धोत्रे, ज्ञानदेव नामदेव धोत्रे व सागर सुरेश बोटे सर्व राहणार भानगाव तालुका श्रीगोंदा हे ढोरजा येथे प्रवीणच्या टपरीवर आले. तू कशाचे पैसे मागतो..? असे म्हणून, जातीवाचक व अश्लील शिवीगाळ करत प्रवीणला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. सचिनने यावेळी प्रवीणच्या गालावर व दंडावर चाकूने जबर वार करून त्याला जखमी केले. यावेळी प्रवीणचा भाव बबन हा भांडण मिटवण्यासाठी मध्ये आला. तर, त्याचाही उजव्या हाताच्या दंडावर व डोक्यावर चाकूने वार करून, त्याला गंभीर मारहाण करत, जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

या प्रकरणी प्रवीणने काल दिनांक ३१ डिसेंबर २०२१ रोजी बेलवंडी पोलीस ठाण्यात अनुसूचित, जाती जमाती अत्‍याचार प्रतिबंधक कायदा अर्थात ॲट्रॉसिटी नुसार गुन्हा दाखल केला आहे. Two brothers stabbed in Shrigonda

सदरील गुन्हा (सहाय्यक फौजदार) भापकर यांनी दाखल केला असून, घटनास्थळी पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी भेट दिली आहे. या प्रकरणात तपासी अमलदार अण्णासाहेब जाधव (उपविभागीय पोलीस अधिकारी, कर्जत) असून, आरोपींना अद्याप अटक केली नसल्याचे समजते आहे.

स्रोत:(फिर्याद)

Leave a Reply