काँग्रेसचा रस्ता-रोको आंदोलनचा इशारा..! कामं सुरू करा. अन्यथा, आंदोलन निश्चित..

दिनांक १ जानेवारी,श्रीगोंदा:

राष्ट्रीय महामार्ग १६०(एन.एच) नगर- दौंड रस्त्याचे राहिलेले काम त्वरित पूर्ण करून सदर रस्ता रुंदीकरण करून दुभाजक बसविण्यात यावेत.याकरिता दि.३ जानेवारी रोजी पारगाव फाटा याठिकाणी युवक काँग्रेसच्या वतीने रस्ता-रोको आंदोलनचा इशारा निवेदनाद्वारे दि.२७ डिसेंबर रोजी देण्यात आला होता.या निवेदनाची दखल घेऊन पोलिस निरीक्षक रामराव ढिकले व नाईक तहसीलदार पंकज नेवसे साहेब यांनी आज MSRDC विभागाच्याच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती.

या बैठकीमध्ये युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले.ते म्हणाले की,नगर-दौंड महामार्गाच्या अपूर्ण कामामुळे व हलगर्जीपणामुळे कित्येक निष्पाप लोकांना आपला जीव गमावला लागला.रस्ताच्या आजूबाजूच्या लोकांना धुळीमुळे प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे.तरी याचा गांभीर्यपूर्वक विचार करून चिखली घाट, घारगाव,लोणीव्यंकनाथ येथील रस्ता तातडीने पूर्ण करावे व रस्त्यावर रिफ्लेक्टर बसवावे. Congress warns of road blockade ..! Get started. Otherwise, the movement is certain.

संबंधित अधिकाऱ्यांनी काम पुर्ण करण्यासाठी आलेल्या अडचणी नाईक तहसीलदार साहेब व पोलिस निरीक्षक साहेब यांच्या समोर मांडल्या.संबधित अधिकारी म्हणाले की,काम पुर्ण करण्यासाठी ज्या अडचणी निर्माण झाल्या होत्या त्या बर्‍यापैकी मार्गी लागल्या आहेत.येत्या काही दिवसांत आम्ही संपूर्ण काम पुर्ण करणार आहोत.आज वाहतूक करणाऱ्यांना जी अडचण निर्माण होत आहे त्यासाठी उद्या पासून काम सुरू करून लोकांची अडचण व होणारा त्रास होणार नाही याची काळजी घेऊ.

जर उद्या काम सुरू झाले नाही तर रास्तारोको आंदोलन स्थगित करणार नाही असे आंदोलनकर्ते म्हणाले. या बैठकीमध्ये माजी पं.स.सदस्य, मनीष जगताप,लोणीचे मा.सरपंच मिथून नगरे, प्रा.यागेश मांडे, युवा नेते प्रमोद राजेंद्र म्हस्के, युवक काँग्रेसचे भूषण शेळके, आशिष लडकत, सरपंच ठोंबरे, किरण चव्हाण, प्रशांत साबळे व‌ आदी पदाधिकारी उपस्थित होते.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply