२८ जानेवारी रोजी ग्रामपंचायत सरपंच पद आरक्षण सोडतीबाबत सभा..

दिनांक २५ जानेवारी, श्रीगोंदा:

सन २०२० ते २०२५ या कालावधी करीता श्रीगोंदा तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पदाची आरक्षण सोडत विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील सर्व ८६ ग्रामपंचायतीचे सदस्य, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य तथा सर्व नागरिकांना कळविण्यात येते की, मा. उपसचिव महाराष्ट्र शासन यांचेकडील पत्र क्र ग्रापनि / २०२० / प्र.क्र. ६ / पंरा -२ दिनांक ० ९ / ०३ / २०२० , महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग मुंबई यांचेकडील अधिसूचना क्रमांक ग्रापनि -२०२० / प्र क्र ६ / पंरा २ दिनांक ०५/०३/२०२० व मा. जिल्हाधिकारी अहमदनगर यांचेकडील पत्र क्रमांक कावि / ग्रापं / कार्या ८ अ / ५३ / २०२१ दिनांक २२/०१/२०२१ अन्वये श्रीगोंदा तालुक्यातील सर्व ८६ ग्रामपंचायतीच्या (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच नागरिकांचा मागास प्रवर्ग व खुला प्रवर्ग यांचे सरपंच पदाचे आरक्षण सन २०२० ते २०२५ करीता आळीपाळीने (रोटेशन) पध्दतीने आरक्षीत करावयाचे आहे.

या करीता ठिकाण श्री. छत्रपती शिवाजी महाविद्यालय, जिमखाना, श्रीगोंदा येथे दिनांक २८ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ११:०० वाजता विशेष सभा आयोजीत केलेली असुन, सर्वांनी उपस्थित रहान्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.

स्रोत:(श्रीगोंदा पोलीस ठाण्यामार्फत देण्यात आलेले जाहीर प्रकटन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading