दिनांक २५ जानेवारी, श्रीगोंदा:
कुकडी लाभक्षेत्रातील डी.वाय.१२ चारी रिपेरिंगचे काम अंतिम टप्प्यात असून, डी.वाय.१२ चारीवरील किलोमीटर सहा ते पंधरा या लाभ क्षेत्रामध्ये येणारे सात केटी बंधारे कुकडीच्या पाण्याने भरून मिळावे. तसेच, या बंधाऱ्यांना कुकडी प्रकल्पामध्ये समाविष्ट करावे. यासाठी संभाजी ब्रिगेडने कुकडीचे अधीक्षक अभियंता धुमाळ यांना निवेदन सादर केले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, गेली दहा वर्ष नमूद कार्यक्षेत्राला पाणी पोहोचलेच नाही. या भागामध्ये नव्याने सात बंधारे आंबील ओढा याठिकाणी तयार झालेले आहेत. या बंधाऱ्यामुळे या परिसरामध्ये शेतीचे नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी या बंधाऱ्यांचा कुकडीमध्ये समावेश व्हावा. यापद्धतीने नियोजन झाल्यास, प्रत्येक रोटेशनला पाणी मिळेल. यामुळे शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती सुधारन्यास मदत होईल.

या आणि विविध मागण्यांसंदर्भात कुकडीचे अधीक्षक अभियंता धुमाळ यांना परिसरातील शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन संभाजी ब्रिगेडने सादर केले आहे.
स्त्रोत:(नानासाहेब शिंदे,संभाजी ब्रिगेड, श्रीगोंदा)
