एम.पी.डी.ए. कायदयाअंतर्गत श्रीगोंदा पोलीस स्टेशन हद्दीतील आशीफ शमशुद्दीन तांडेल १ वर्षाकरिता स्थानबंध्द…

दिनांक २४ फेब्रुवारी २०२४, श्रीगोंदा:

इसम नामे आशीफ शमशुद्दीन तांडेल वय वर्षे ३०, तांडेलगल्ली पेडगांव ता, श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर यांचेवर श्रीगोंदा पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत. त्यात गैरकायदयाची मंडळी जमवणे, घराता घुसून मारहान करणे, गंभीर दुखापत करणे, जबर दुखापत करणे, किरकोळ दुखापत करणे, दमदाटी करणे, शिवीगाळ करणे जिवे ठार मारण्याचा प्रत्यन करणे, मालमतेचे नुकसान करणे, अश्लिल शिवीगाळ करणे, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, वाहन चोरी करणे, रस्ता आडवणे करणे, विनयभंग करणे, चाकुचा धाक दाखणे, बळजबरीने पैसे घेणे, हद्दपार आदेशांचे उल्लघंन करणे, गन्हे दाखल असणाऱ्या विरुध्द श्रीगोंदा पोलीस स्टेशन एम.पी.डी.ए प्रस्तावान्वये मा जिल्हाधिकारी साहेब अहमदनगर यांच्याकडे सादर करण्यात आला होता.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार नमुद स्थानबंध्द इसमावर गुन्हे दाखल असुन, त्यास त्या गुन्हयांमध्ये वेळोवेळी अटक करण्यात आल्यानंतर तो न्यायालयातून जामीनावर सुटताच पुन्हा भारतीय दंड विधान, व मुंबई पोलीस कायदा अंतर्गत सराईत पणे गुन्हे करीत होता, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता व आपल्या सोबत असणा-या गुंडासोबत घातक शस्त्रे सोबत ठेवून लोकांवर दहशत व भिती निर्माण करीत होता.

त्यास कायदयाचा अजिबात धाक राहिलेला नव्हता. त्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेला मोठया प्रमाणात बाधा निर्माण होवून लोकांच्या मनात असुरक्षीतेची भावना तयार झाली होती. दिवसेन दिवस वेगवेगळ्या तऱ्हेने गुन्हे करण्याची त्याचे प्रवृत्ती बळावत असल्याने, सर्व सामान्य लोकांच्या जिवीतास तो उपद्रवी बनला होता, त्यामुळे त्याचे विरुध्द महाराष्ट्र झोपडपटटी दादा, हात भटटीवाले औषधी विषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती व दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती (व्हीडीओ पायरेट) यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणे बाबत अधिनियम सन १९८१ नुसार “धोकादायक व्यक्ती” या संज्ञेत तो मोडत असल्याने त्याचे विरुध्द सदर कारवाई करणे आवश्यक होते.

त्यानुसार श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांनी त्याचे विरुध्द चौकशी पूर्ण करुन दिनांक १६ जानेवारी २०२४ रोजी पोलीस अधिक्षक अहमदनगर मा. राकेश ओला साहेब याचे कडेस प्रस्ताव सादर केला होता. सदर प्रस्तावाची पडताळणी करुन पोलीस अधिक्षक सो. यांनी मा. जिल्हा दंडाधिकारी अहमदनगर यांचे कडेस पाठविलेला होता.

त्यानुसार मा. जिल्हाधिकारी अहमदनगर यांचे कडील आदेशनुसार  मा. जिल्हाधिकारी यांचे कार्यालय अहमदनगर दिनांक. २२ फेब्रुवारी २०२४ च्या सदर अधिनियमान्वये स्थानबध्द इसम नामे आशीफ शमशुद्दीन तांडेल वय वर्षे ४०, तांडेलगल्ली पेडगांव ता, श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर यास स्थानबध्दतेचे आदेश जारी केला.

त्यानुसार मा पोलीस अधिक्षक राकेश ओला साहेब, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, मा उप विभागीय पोलीस अधिकारी श्री, विवेकानंद वाखारे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग याचे मागदर्शनाखाली श्रीगोंदा पोलीस निरीक्षक श्री ज्ञानेश्वर यानी व त्याचे पथकातील अमलदार यानी दिनांक २२ फेब्रुवारी २०२४ रोजी ताब्यात घेवून त्यांची जिल्हादंडाधिकारी याचे आदेशाप्रमाणे मध्यवर्ती कारागृह नाशिक याकारागृहात रवानगी करण्यात आलेली आहे. सदर कारवाई पोलीस निरीक्षक, ज्ञानेश्वर भोसले, पोउपनि समीर अभंग, पोना गुलाब मोरे, पोकों संभाजी गर्जे, तसेच पोकों सचिन गोरे व पथकाने सदरची कारवाई केली आहेत.

स्रोत:(ज्ञानेश्वर भोसले, पोलीस निरीक्षक, श्रीगोंदा पोलीस स्टेशन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading