दिनांक २४ फेब्रुवारी २०२४, श्रीगोंदा:
शहरासह तालुक्यातील जनतेला cyber crime, Cyber scam, spam अश्या बाबी मोबाइल आणि इंटरनेट वापरामुळे पाहण्यास मिळत होत्या. मात्र, त्याची प्रत्यक्ष अनभुती आता अनेकांना होऊ लागल्याचे समोरं येत आहे.
श्रीगोंदा शहरात मागिल काही दिवसांपासून शेअर मार्केट, पैसे लावा एका महिन्यात डबल होतायेत, arnx, बजाज, xdm, निफ्टी, सेन्सेक्स, इन्फिनिटी, सेबीचे लायसन्स, ब्रोकर, पुट, कॉल, प्रॉफिट, लॉस अश्या सर्व सामान्य माणसाच्या विचार आणि अनुभवा पलीकडील बाबी व शब्द ऐकण्यास आले.
या सर्व गोष्टींची पार्श्वभूमी नसणाऱ्या लोकांनी एकमेकांच्या सांगण्यावर विश्वास ठेवत पैसे बुडले तर बुडले..! म्हणत, मनाची तयारी करून ५ हजार, १० हजार पासुन लाखा पर्यंत पैसे काही ॲप मध्ये गुंतवले.. शिफारस करणाऱ्या माणसांनी अनेकांचे संदर्भ देतं या डबलच्या फंद्यात लोकांना ओढलं. मागील महिन्यात वरील नमूद ॲप पैकी बजाज आणि xdm नावाचे ॲप लोकांच्या पैश्यासह गुडूप (बंद) झाल्याचे सर्वांना न्यात आहे.
आत्ता Arnx नामक कंपनीत मोठी गडबड सुरु असल्याचे आढळून आले आहे. लोकांनी पैसे येतायेत.. अनेकांना लाखांनी आलेत.. आपल्यालाही येतील.. या लालसे पोटी आर्थिक सक्षम असलेल्यांनी जवळचे, दुर्बलांनी किडुक मिडुक मोडून, जुळवा जुळव करीत यात पैसे टाकले. काही दिवस यात ५ हजाराला ३००/- व १० हजारला ७००/- च्या आसपास रुपये येऊ लागले.
यात Loss, profit करत मुख्य रक्कमेत कमी जास्त वाढ व्हायची.. मात्र, कंपनीने सूचना करून बँक चालु केली. त्यात loss नव्हता. त्यामुळे लोकांनी बँकेत मुख्य रकमेतून ६ हजार रुपयेही बँकेत टाकून दिले. मुख्य रकमेतील पैसे काढता येत होते. तशी सुविधा होती.. परंतु, बँकेतील पैसे एक महिन्या शिवाय काढता येत नव्हते. नुकतेच बऱ्याच जणांचे पैसे काढण्याची वेळ पुर्ण झाल्यावर.. काल दिनांक २३ फेब्रुवारी रोजी पैसे काढण्यासाठी कंपनीने एक मेसेज जारी केला. ज्यात त्यांनी नमूद केले की, भारत सरकारच्या नियमानुसार पैसे काढण्यासाठी ५ हजार रुपयांचे रिचार्ज करुन kyc करावी लागेल. यावरून सदरील ॲप अनपेक्षित मागणी करीत असल्याचे स्पष्ट होत आहे. kyc केल्यास आपल्या खात्यातील पैसेही गुंढळण्याचा डाव कंपनीने आखल्याचे आता बोलले जात आहे.
एकंदर ॲप लॉजं झाले.. पैसे येतायेत.. पैसे टाकतांना पैसे गेले तर गेले.. अशी मानसिकता तयार करण्यात आली… बँकेची घोषणा झाली.. बँकेत loss होत नव्हता.. लोकांनी मुख्य रकमेतील निघत असलेले पैसे पुन्हा एक महिन्यांच्या कालावधीसाठी बँकेत जमा केले.. बँकेतले पैसे निघण्याची वेळ आली.. पैसे निघन्यास अडचणी… आणि आता सरकारी नियमानुसार kyc करावी लागेल अशी अट घालण्यात आली आहे… त्यामुळे “लोकांनी सावधान व्हावे.. “हा ॲपचा ट्रॅप असु शकतो”…! असे म्हणणारांच्या शक्यतेची पुष्टी होऊ लागल्याने.. श्रीगोंदा तालुक्यातील लोकं Cyber Crime चे शिकार झालेत काय..? असा सवाल विचारला जाऊ लागलाय..
आता इरत ॲप प्रमाणे सदरील ॲपही फ्रोड असण्याची शक्यता अनेकांकडून वर्तवली जात आहे. एकंदर १० लाखाहून अधिक लोक या ॲपच्या ट्रॅप मध्ये असल्याचे बोलले जात आहे. काहींचा फायदा झाला.. मात्र बहुतांश लोक या बुडत्या होडीचे प्रवाशी आहेत.. फक्त हि नावं डूबनार कधी याची प्रतीक्षा करावी लागणार आहे..
स्रोत:(sting operation)
