दिनांक २३ फेब्रुवारी २०२४, श्रीगोंदा:
मिळालेल्या अधिकृत माहितीनूसार तालुक्यातील भानगाव येथील रहिवाशी असलेल्या साबळे याने त्याच्या श्रीमंतीचे शिखर ड्रगच्या गोरख उद्योगातून गाठल्याचा तर्क पोलीसांनी लावला आहे. त्याबाबत पुणे पोलीसांनी दिलेल्या माहितीत स्पष्ट केले आहे की, कुरकुंभ येथील अर्थकेम कंपनीचा मालक जो मूळचा श्रीगोंदा तालुक्यातील भानगावचा रहिवाशी आहे, त्याने मागील १५ वर्षांपूर्वी कुरकुंभ एमआयडीसी येथे कंपनी सुरू केली होती.
अनिल साबळे हा सुरुवातीला कंपनीत दुचाकीवरून प्रवास करायचा. मात्र, त्याच्या आर्थिक परस्थितीत अल्पावधीतच सुधारणा होत गेली. त्याच्याकडे आलिशान चारचाकी गाड्या आल्या. मागच्या चार-पाच वर्षांमध्ये तर, त्याने श्रीमंतीचे कळसच गाठले, त्याचा हा दुचाकी ते महागड्या चारचाकी गाड्यांपर्यंतचा प्रवास ड्रग्जच्या माध्यमातूनच झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
या बाबत मिळालेली माहिती अशी की, साबळेची भानगाव येथे शेती आहे. त्याचे आई वडील आणि भाऊ नमूद शेतीचे कामं पाहतात. बऱ्याच वर्षांपूर्वी अनिल साबळे हा पुण्यात उद्योगाच्या दृष्टीने गेला होता. त्यांनतर त्याने कुरकुंभ येथे केमिकल फॅक्टरी टाकल्याचे स्थानिक नागरिकांकडून समजते आहे. त्यातच तो येवढ्या मोठया प्रकरणात आरोपी असल्याने तालुक्यात यप्रकरणी चर्चा होऊ लागली आहे.
श्रीगोंद्यातही सामान्य माणसं अचानकच श्रीमंत झालेत…!
श्रीगोंद्यातही बरीच माणसे साबळे सारखीच साधारण आयुष्य जगत होती. मात्र, त्यांच्या जीवनात काही अमुलाग्र हालचाली जाणवल्या अंन ते रातोरात श्रीमंतीच्या कगारवर पोहचलेत.. काही वर्षांपुर्वी ठराविक कार्यक्षेत्र आणि मर्यादित संसाधन असणारे आज मोठे उद्योगपती झालेत.. काही जन घोडीवर गाव गाव जाऊन कापड विकायचे. त्यांचे वंशज आज कापड उद्योगातील महारथी आहेत… सोने चांदी उद्योगात नामांकित आहेत. बऱ्याच तालुक्यात त्यांचे शोरुम आहेत.
काही वर्षांपूर्वी श्रीगोंदा शहरात वराह पालन करणारा साधरण माणूस आज महागड्या गाड्या, आलिशान बंगला, शेती, सोन, नानं.. सह उद्योगपती होऊन मिरवतो..
तर, एकेकाळी आपल्या किराणा दुकानात तुटपुंज्या आर्थिक परस्थितित मेटाकुटीला आलेले दुकानदार आज जिल्ह्यातील प्रसिध्द व्यापारी आणि साठेबाज आहेत.. अशी अनेक उदाहरणे आहेत. ज्यात सामान्य माणूस अचानक असामान्य झाला.. अल्पावधीत अल्प साधनांच्या मदतीने एवढा प्रचंड मोठा बदल कसा झाला..? याचेही अध्ययन होणे अपेक्षित आहे.
स्रोत (ऑनलाईन वृत्त )
