दिनांक २३ फेब्रुवारी २०२४, श्रीगोंदा:
शहरातील सुशिक्षित तसेच, सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक वारसा असणाऱ्या अनभुले कुटूंबातील अक्षय यांनी त्यांचे वडिल सामाजिक पदाधिकारी सुनिल अनभुले आणि शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या आई अलका अनभुले यांच्या मार्गदर्शनानुसार घरी आगमन होणाऱ्या तीन महिन्यांच्या राजलक्ष्मीच्या जन्माचे माता भगीनिंच्या उपस्थितीत जंगी स्वागत करण्याचे आवाहन स्वीकारून, राजलक्ष्मी आणि तिच्या आईचे फटाके वाजवून, शहरभर मिरवणूक काढत शेकडो महिलांच्या समवेत वाजत/गाजत घरी पदार्पण केले.
एकीकडे मुलीचा जन्म ओझं मानून तिचे मातीमोल करणाऱ्या समाजाच्या मानसिकतेला छेद देत अनभुले यांनी मुलीच्या जन्माचे स्वागत करून समाजाला “बेटी बचाव बेटी पढाव” चा अनोखा संदेश दिला आहे. यावेळी जन्मानंतर आपल्या घरी आलेल्या राजलक्ष्मीच्या स्वागताची शहरात मोठी चर्चा झाली. यावेळी उपस्थित महिलांनी हळदी कुंकू लावून, एकमेकींचा आदर केला.
समाजाने तसेच व्यवस्थेने नाकारलेल्या आणि सतत मुलांपेक्षा दुय्यम दर्जा देण्यात येणाऱ्या मुलींच्या जन्माचे कौतुक होऊ लागल्याने महिलांमध्ये पुरुष प्रधान संस्कृतीत मानवी मूल्य जपणारे कुटुंब अनभुले यांच्या रूपाने असल्याने त्यांचा हेवा वाटतो. अश्या प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या आहेत.
यापूर्वी अक्षय अनभुले यांच्या परिवाराने वंचित आणि दुर्लक्षित घटकांतील काही मुलींच्या संगोपनाचा वारसा जोपासलेला आहे. त्या मुलींची प्राथमिक ते माध्यमिक शिक्षणापर्यंतची सर्व जबाबदारी अनभुले कुटुंबाने घेतल्याचे यावेळी समजले. तर, सध्या या मुली आपल्या प्रपंचात आनंदाने राहत असुन, त्यांच्या सुख दुःखात आम्ही सहभागी होतोत. असेही अक्षय अनभुले यांनी सांगितले आहे.
स्रोत:(आयोजित कार्यक्रम)

