परिक्रमा औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयातील कु. धनश्री भोसले निबंध स्पर्धेत द्वितीय.

दिनांक ९ मे(काष्टी,श्रीगोंदा):

श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील बबनराव पाचपुते विचारधारा ट्रस्टच्या ‘परिक्रमा’ शैक्षणिक संकुलातील औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयातील चतुर्थ वर्षातील कु.धनश्री मोहन भोसले हिने नामदार राधाकृष्ण विखे पाटील मित्र मंडळ आयोजित आयोजित ऑनलाईन निबंध स्पर्धेत ‘समाजापुढील आजची आव्हाने’ या विषयावर द्वितीय क्रमांक पटकावला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील निर्मळ यांनी दिली.

तिला प्रा.वैशाली फाळके यांचे मार्गदर्शन लाभले. शैक्षणिक अभ्यासक्रमासोबत अभ्यासेतर उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी परिक्रमा सतत प्रयत्नशील असते. यशस्वी विद्यार्थिनीचे परिक्रमा संकुलाचे संचालक प्रतापसिंह पाचपुते यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading