लवकरच नवीन जिल्हा कार्यकारणी करणार: आप्पा कोलंगडे..

दिनांक १२ मार्च २०२४, श्रीगोंदा:

शिवसंग्रामचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष आमदार विनायकराव मेटे साहेबांच्या अपघाती निधन झाल्यामुळे नगर जिल्हयात नव्हे तर, राज्यातील शिवसंग्राम विस्कळीत झाली होती. परंतु, आदरणीय जोतीताई मेटे यांनी शिवसंग्रामची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतल्याने संघटनेत नवं चैतन्य निर्माण झाले असून, नगर जिल्ह्यात देखील तिचा प्रत्यय आम्हाला आलाय. लवकरच नवीन जिल्हा कार्यकारणी जाहीर करणार असल्याचे अहमदनगर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख बीड जिल्ह्याचे नेते प्रभाकर आप्पा कोलंगडे यांनी शासकीय विश्रामगृह, अहमदनगर येथे शिवसंग्रामच्या बैठकीमध्ये मार्गदर्शन करताना सांगितले. यावेळी बैठकीचे अध्यक्षस्थानी शिवसंग्राम नेते मच्छिंद्र सुद्रीक हे होते.

यावेळी शिवसंग्राम आष्टी तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर दादा चौधरी, पाथर्डीचे तालुकाध्यक्ष परमेश्वर टकले, शामराव ओझा साहेब, प्रशांत लांडगे, शिवाजी गोंधळी, मोहन पारे, जिजाबापू मांडे, छोटू घोडके सह नगर दक्षिण मधील नगर, पारनेर, शेवगाव, जामखेड, कर्जत, श्रीगोंदा, पाथर्डी तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते.

यावेळी बोलताना कोलंगडे म्हणाले की, राष्ट्रीय अध्यक्ष विनायकराव मेटेसाहेब यांच्या सूचनेवरून मागील लोकसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पाठीमागे शिवसंग्रामने ताकद लावली होती. त्यामध्ये डॉ. सुजय विखे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला होता. लोकसभेनंतर अहमदनगर दक्षिणमध्ये विधानसभेला शिवसंग्रामचा एक सुद्धा उमेदवार नसताना महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार कर्जत – जामखेड मतदारसंघ वगळता शिवसंग्रामच्या मावळ्यांनी केला होता असे ते म्हणाले. यावेळी पाथर्डीचे परमेश्वर टकले यांनी आभार मानले.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र) 

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading