दिनांक १४ मार्च २०२४, श्रीगोंदा:
तालुक्यातील आढळगाव येथे आज सकाळी ५४८ डी महामार्गावर बस मोटार सायकल यांच्यात झालेल्या अपघातात एका स्थानिक व्यक्तीचा बळी घेतला आहे. आढळगाव जवळील खैरवडा वस्ती येथील गौतम जयवंत छत्तीसे हा इसम आढळगाव येथे दुचाकी वर गावात कामानिमित्त आला होता त्यावेळी हि दुर्घटना घडली.
गावातून परत घरी जात असताना महामार्गावरील कोकणगाव फाटा येथे दुचाकी व जामखेड – स्वारगेट बस क्रमांक एम एच ११ बी एल ९२३९ पुण्याकडे जात असताना अपघात झाला. त्यात गौतम छत्तीसे वय वर्षे ४१ या इसमाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात राष्ट्रीय महामार्गाचे काम चालू असल्याने रोडवर टाकलेल्या मुरमामुळे झाला असून, मयत कुटुंबीयांच्या नातेवाईकांनी या घटनेनंतर काही वेळ नमूद रस्ता रोखला होता.
स्रोत:(पत्रकार सचिन शिंदे व अमोल डाळिंबे)
