सुफी संत शेख महमंद बाबा यांच्या ४०६ व्या संदल/उरूस निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन..

दिनांक १७ मार्च २०२४, श्रीगोंदा:

तालुक्यातील सर्व समाज बांधवांचे श्रद्धास्थान, महाराष्ट्रातील प्रसिद्ध संत आणि देश पातळीवर सर्व धर्मियांच्या ऐक्याचे प्रतिक असणाऱ्या सुफी संत शेख महमंद बाबा यांचा ४०६ वा संदल उर्स शरीफ मोठया आनंदाने श्रीगोंदा शहरात विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होणारा आहे.

शनिवार दिनांक १६ मार्च २०२४, रोजी कुरआन (खानी) पठण करण्यात आले आहे.

रविवार दिनांक १७ मार्च रोजी रात्री ११:१५ वाजता संदल (चंदन) चा कार्यक्रम संपन्न होणारं आहे.

सोमवार दिनांक १८ मार्च रोजी रात्री ९:३० वाजता कव्वाली प्रोग्राम होणारं आहे.

मंगळवार दिनांक १९ मार्च रोजी सायं ७:१५ वाजता लंगरखाना (महाप्रसाद) तर,

बुधवार दिनांक २० मार्च रोजी उरुस/यात्रा, जियारत असुन,

गुरुवार दिनांक २१ मार्च रोजी दुपारी २:०० वाजता कुस्त्यांचा आखाडा रंगणार आहे.

संपूर्ण देशाला सद्भावना आणि भाईचाऱ्याचा संदेश देणारे राष्ट्रीय संत शेख महमंद बाबा यांचा उरुस/यात्रा मोठ्या आनंदाने आणि शांततापूर्ण वातावरणात पार पडणार आहे. अनेक वर्षाच्या परंपरेने चालत आलेले श्रध्देने आणि उपासनेने, भाईचारा अबादित ठेवत, उरुसाचा उस्तव साजरा करण्याचे आवाहन ह. शेख महमंद बाबा दर्गाह ट्रस्ट, श्रीगोंदा आणि श्रीगोंदा पोलीस प्रशासनाने केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा श्रीमंत मालोजी राजे भोसले यांचे गुरू, सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान दुरवेश (फकीर) सुफी संत शेख महमंद बाबा यांच्या संदल/उरुस निमित्त दिनांक १८ मार्च २०२४ रोजी रात्री ९:३० वाजता सुप्रसिद्ध कव्वाल युसुफ शोला यांचा कव्वाली भक्ती गीतांचा कार्यक्रम शेख महमंद बाबा दर्गाह पटांगण, श्रीगोंदा येथे आयोजीत केला असुन, या कार्यक्रमासाठी सर्व भाविक भक्तांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे.. असे आवाहन दर्गाह ट्रस्ट मार्फत ग्रामस्थांना करण्यात आले आहे.

स्रोत:(आयोजीत कार्यक्रम पत्रिका)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading