श्रीगोंदा शहरात या पेट्रोल पंपाला चिकटून लावण्यात आलेल्या पाळण्यांची स्थानिक प्रशासनाने परवानगी नाकारावी..! लाईटचे जाळे, वर्दळ, पेट्रोल, डिझेलच्या टाक्या, टँकर आणि खेटूनच असलेल्या ज्वलनशील इंधन साठ्यामुळे दुर्घटनेची श्यक्यता निर्माण होत आहे..! मुख्याधिकारी भगत मॅडम आणि तहसिलदार वाघमारे मॅडम यांनी याबाबत खबरदारी घ्यावी..!
दिनांक १७ मार्च २०२४, श्रीगोंदा:
तालुक्याचे आकर्षण असणाऱ्या संत शेख महमंद बाबा यांचा उरुस/यात्रा मोठ्या उत्साहात साजरा होणारा आहे. मात्र, या आनंदाला गालबोटं तर लागणार नाही ना..? याची खातरजमा स्थानिक प्रशासनाचे प्रमुख म्हणुन, तहसिलदार क्षितिजा वाघमारे मॅडम व या पाळणा मालकांना परवानगी देणाऱ्या श्रीगोंदा नगर पालिका प्रशासनाच्या मुख्याधिकारी पुष्पगंधा भगत मॅडम यांनी निश्चित करावी.. अशी अपेक्षा स्थानिक नागरीक व्यक्त करतांना समोरं येत आहेत.
याविषयी सविस्तर असे की, श्रीगोंदा शहरातील पारगाव रोडवरील नायरा पेट्रोलियमच्या पंपाला अगदी खेटून लावलेल्या पाळन्यांमुळे मोठी गडबड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण यात्रेच्या निमित्ताने उभारण्यात आलेले मोठं मोठाले पाळणे हे लाईटच्या जनरेटर आणि विजेच्या अस्थाव्यस्थ तारांच्या जाळ्यानीं घेरलेले आहे. त्यातच पाळणा सुरु केल्यावर त्याच्या खाली जोडण्यात आलेल्या विद्युत वाहिण्यांतून चकमक होत असते. या ठिकाणी पसरलेले लाईटचे जाळे, होणारी वर्दळ, जवळच असलेल्या पेट्रोल, डिझेलच्या टाक्या, टँकर आणि लागूनच असलेल्या ज्वलनशील इंधन साठ्यामुळे दुर्घटनेची श्यक्यता वर्तवली जात आहे.
या यात्रा उस्तवाच्या व्यस्त प्रसंगी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मोठी दुर्घटना घडल्यास..! सामान्यांची मोठी हानी होण्याची शक्यता निर्माण होत आहे. त्यामूळे खबरदारीची उपाययोजना करून संबंधीत पाळणा चालक – मालकांना पेट्रोल पंपा शेजारील युनिट शक्य असल्यास स्थलांतर करण्याच्या किंवा बंद करण्यासाठी सक्तीच्या सूचना कराव्यात… अन्यथा त्यांना परवानगी देण्यात येऊ नये. अशी मागणी केली जात आहे.
स्रोत:(मिळालेल्या माहितीनुसार)
