दिनांक २५ मार्च २०२४, श्रीगोंदा:
आज शहरातील राम मंदिरात शिवसेना (शिंदे गट) पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत संघटनेतील महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख पदाच्या नवंनियुक्त पदाधिकारी मिराताई शिंदे याच जिल्हा प्रमुख असल्याचे स्पष्ट केले असुन, सामाजिक कामांचा आढावा घेवून वरिष्ठांनी शिंदे यांची नियुक्ती केल्याचे पत्रकारांना सांगितले आहे.
तर, मागील दोन वर्षांपासून अनेक संकटांना पार करत, वाड्या/वस्त्या आणि समाजातील दुर्बल घटकांच्या प्रश्नासाठी झटून संघटना वाढविण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत संघटनेतल्या काही जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या आग्रहास्तव मला डावलल जात असुन, जिल्हा पदाधिकाऱ्याने जिल्हा पदाधिकाऱ्याची केलेली निवड ही सनदशीर अशू शकत नाही. जोपर्यंत सचिव हे पद नियुक्त करीत नाहीत.. तोपर्यंत हे पद वैध मानता येणार नाही. त्यामूळे मीच जिल्हा प्रमुख असल्याचे मत मनिषाताई काळे यांनी नमूद केले आहे.
आज राम मंदिरात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना संघटनेच्या वतीने विविध विषयांचा आढावा घेण्यात आला. यावेळी संतोष शिंदे, मिराताई शिंदे, नंदु ताडे, अनिल ननावरे, जिजाबापू गलांडे, शिवा ताडे सह शिवसेना (शिंदे गटाचे) कार्यकर्ते उपस्थित होते.
दोन वर्षांत काळेंच कामं दिसल नाही. मी अनेक वर्षांपासून सामाजिक कामांत सक्रिय आहे. माझे पद नियुक्त झाल्यावर काळेंनी पदाधिकाऱ्यांना अरेरावीची भाषा वापरली. सुसंवाद मेळाव्यात दम दिला. मात्र, मी संघटनेच्या व वरिष्ठांच्या सूचनेनुसार सामाजिक कामांत सक्रिय राहणार आहे.
मिराताई शिंदे..
माझे प्रत्येक गावात सामाजिक कामं आहे. संघटनेच्या तालुका प्रमुख ते जिल्हा प्रमुख हा प्रवास कामांच्या आधारे केलेला आहे. मी लावलेल्या झाडाचे फळ मिळवण्याचा प्रयत्न कोण करीत असेल.. तर, मी त्याचा निषेध करते. महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी आणि महिला माझ्या समर्थनात आहेत. पक्ष मला वरिष्ठ पद देतं असुन, मी आहे त्या जिल्हा प्रमुख पदी कामं करण्यास तयार आहे. या निवडीने जुन्या महिला आघाडीवर अन्याय होतोय.
मनिषाताई काळे..
मनिषाताई काळे यांची नियुक्ती झाल्यावर चार पाच तालुक्याची जबाबदारी देण्यात आली. मात्र महिला आघाडीचे कामं कमजोर असल्याचे वरिष्ठांकडून सूचना आल्या. म्हणुन, आम्ही मिराताईनां विचारले. त्यांनी सुरवातीला नकार दिला. लढाऊ असल्याने सामन्यांचे प्रश्न सोडवतील यासाठी अनिल शिंदे, सचिन जाधव, नंदू ताडे यांनी विचारल्यावर शिंदे यांनी होकार दिला. काळेंच्या कालखंडात काहीच कामं झालं नसल्याने, वरिष्ठांच्या सूचनेनुसार मिराताई शिंदे याच महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख आहेत. पार्टी काळेंचा विचार करणारं आहे. मात्र, त्यांनी मिराताईनां विचारात घेऊन, संपर्क साधत संघटना वाढीसाठी प्रयत्न करावा..
नंदू ताडे..
शिवजयंती..
दिनांक २८ मार्च २०२४ रोजी सकाळी शिवजयंती साजरी होणारं असून, प्रतिमापूजन करीत संध्याकाळी भव्य मिरवणूक काढण्यात येणार असल्याने शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन ताडे यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिलेल्या माहितीत केले आहे.
स्रोत:(पत्रकार परिषद व अधिकृत माहितीनूसार)
