श्रीगोंदा… निवडणूक भरारी पथकातील पोलीस कर्मचारी on-duty मद्यधुंद अवस्थेत..

दिनांक २५ मार्च २०२४, श्रीगोंदा:

आदर्श आचार संहिता लागू झाल्यानंतर जिल्हा प्रशासन आणि जिल्हाधिकाऱ्यांमार्फत श्रीगोंदा तालुक्यात नेमण्यात आलेल्या भरारी पथकातील पोलीस कर्मचारी मद्यधुंद अवस्थेत आढळून आल्याने परिसरात आश्चर्य व्यक्त करण्यात आले आहे.

स्थानिक प्रशासन.. महसूल आणि पोलीस यंत्रणेने मार्फत आचार संहिता भंग करणाऱ्यांवर कारवाईसाठी नेमलेल्या पथकातील पोलीस कर्मचारी अश्या पद्धतीने दारू पिऊन धिंगाणा घालत होता.. तर, त्याचे ऑन ड्युटी कपडे (वर्दी) खाल्लेल्या अन्नाचे दागाने आणि मातीने माखलेले होते.

कारवाईसाठी आयोगाने ॲपच्या माध्यमातून सक्रिय आणि तत्काळ कारवाईची योजना आखली आहे. परंतु, त्याची अंमलबजावणी करणारे पोलीस आणि प्रशासकिय पदाधिकारी अश्या अवस्थेत आढळून आल्याने कारवाईबाबत लोकांत सभ्रम निर्माण झाला आहे.

सदरील पोलीस कर्मचारी हा बेलवंडी पोलीस ठाण्यात कार्यरत असुन, तो सेनेच्या सेवापूर्तीनंतर पोलीस दलात दाखल झालेला आहे. तसेच, तो पोलीस स्टेशनच्या पश्चिमेकडील तालुक्यातील रहिवाशी असल्याचे समजते आहे.

स्रोत:(मिळालेल्या व्हिडिओनुसार)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading