दिनांक २६ मार्च २०२४, श्रीगोंदा:
घटनात्मक पद्धतीने निवडणुका पार पाडण्यासाठी घटनेच्या कलम ३२४ नुसार निवडणुक आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यापासुन निकाल लागेपर्यंत आचार संहिता लागू असते. (Model code of conduct) साधारण ४५ दिवसांच्या दरम्यान उमेदवार, राजकीय पक्ष, पदाधिकारी यांना नियम लागू राहतात.. देशात १९ एप्रिल २०२४ ते १ जून २०२४ पर्यंत ७ टप्प्यात तर, महाराष्ट्रात १९ एप्रिल २०२४ ते २० मे २०२४ दरम्यान ५ टप्प्यात निवडणुका होणारं आहेत.
आचार संहितेचा भंग कधी होतो..?
आचार संहिता कालखंडात राजकीय पक्ष, पदाधिकारी टीका करु शकतात.. मात्र, त्यात जात, धर्म, वैयक्तिक आयुष्यावरील टीका याचा उल्लेख केल्यास, किंवा मतदारांना महागड्या वस्तूंचे आमिष दाखवने, दारू, जेवण, पैसे वाटप करने, धमकावल्यास.. दबाव टाकल्यास, मतदारांना प्रभावित केल्यास..
संहिता लागु असतांना राजकीय पदाधिकाऱ्याने एखाद्या समारंभात किंवा कार्यक्रमात हजेरी लावून, राजकीय वक्तव्यं केल्यास संबंधित नेत्यावर कारवाई होऊ शकते.
धर्म, जात आणि धार्मिक स्थळांच्या नावावर मत मागितल्यास.. आचार संहितेचा भंग होऊ शकतो.
प्रचार सभा आणि बैठकांची पूर्व सुचना जिल्हाधिकारी व पोलिसांना देतं परवानगी घ्यावी लागते. जेणेकरून यंत्रणा सुरक्षेची व्यवस्था करु शकतील.
राजकीय आरोप प्रत्यारोप होताना, ते तथ्यहीन असल्याची तक्रार केल्यास आचार संहिता भंग केल्याची तक्रार निवडणुक आयोगाकडे C विजील App द्वारे नोंदवता येते. तक्रार नावं नोंदवून किंवा निनावी करता येते.
जाहीरनाम्यासंबंधी नियमावली पूर्ण होतील अश्या प्रकारची आश्वासनं जाहीरनाम्यात द्यावीत. रस्ते, वीज, पाणी अश्या कामांच्या निविदा काढणे संहितेचा भंग मानले जाते.
भावी आमदार/खासदार यांचे बॅनर उतरावे लागतात.. सरकारी संसाधनांचा राजकीय कामासाठी वापर करता येत नाही.
आचार संहिता दरम्यान केंद्र व राज्य शासनाला कुठलीही नवीन घोषणा, योजना व विकासकामांचा निधी घोषीत करता येत नाही.
सरकारी विश्राम गृह आणि मैदानं यांचा सर्वांना वापर करता येऊ शकतो. मात्र, सरकारी वाहन, बंगला आणि इतर शासकीय संसाधनांचा वापर करता येत नाही.
रॅलीत किंवा सभेत प्रक्षोभक भाषण करणे तसेच, विरोधकांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका केल्यास Ipc व crpc तसेच, लोकप्रतिनिधी कायद्याचा भंग झाला म्हणुन, कायदेशीर कारवाईची तरतूद आहे.
आचार संहिता कालखंडात केलेली कामं समाज माध्यमांतून जाहीर करणे.. आचार संहितेचा भंग मानले जाते. सोशियल मीडियावर लक्ष ठेवण्यासाठी आयोगाने ‘मिडिया सर्टिफिकेशन अँड मॉनिटरिंग कमेटीची‘ स्थापना केली आहे.
कोणावर कारवाई होते..?
प्रचारादरम्यान आचार संहिता भंग करणारावर..
मीडियाकडून एखाद्या पक्षाचा प्रचार किंवा चुकीचा प्रचार झाल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाते.
कोणत्याही मिडिया हाऊसने एक्झिट पोल किंवा सर्व्हे जाहीर केल्यास ते कारवाईस पात्र ठरू शकतात.
स्रोत:(ऑनलाईन माहितीनूसार)
