#श्रीगोंदा.. मागील लोकसभा / विधानसभा निवडणुकीत माजी आमदारासह दिग्गज पदाधिकाऱ्यांवर दाखल झालेले आचार संहिता भंग प्रकरणीचे गुन्हे.. हि आहेत ती सात प्रकरनं..

दिनांक २६ मार्च २०२४, श्रीगोंदा:

तालुका कार्यक्षेत्रातील दिग्गज राजकारणी, समाजकारणी, पक्ष पदाधिकारी, आमदार, त्यांचे संबंधीत यांनी मागे झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी तत्कालीन प्रशासनाने ipc, लोक प्रतिनिधी अधिनियम, शासकीय गुपिते अधिनियम, स्फोटके कायदा कलम व पोलीस कायदा कलमांनुसार गुन्हे दाखल केले होते. तर, यातील काही प्रकरण निकाली काढण्यात आली असुन, काही न्यायप्रविष्ठ आहेत. याबाबत स्थानिक पोलीस प्रशासनाने आगामी लोकसभा निवडणुक लक्षात घेता, संबंधीत आरोपींवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन, Crpc १४९ नुसार नोटीस बजावण्याचे ठरविले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मागील २०१४ व २०१९ साली झालेल्या निवडणुकी दरम्यान आदर्श आचारसंहिता भंग करणारी ठळक ७ प्रकरण समोरं आली आहेत. ज्यात उमेदवाराच्या संबंधितांनी वोटिंग मशीन पुजल्या, पैसे वाटप करतांना येथील एका बँकेत झालेला दोन गटांतील राडा, मतदान केंद्रावर व्हिडिओ चित्रिकरण, निवडणूक प्रक्रिये दरम्यान स्फोटकांचा साठा मिळणे, बुथवर दोन इसमांचा एकमेकांत झालेला वाद, मतपत्रिका मतदान करून लिफाफ्यात ठेवताना काढलेला व्हिडिओ व्हायरल प्रकरण इत्यादीचां समावेश आहे.

सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवार बबनराव पाचपुते आणि त्यांचे विरोधी उमेदवार राहूल जगताप यांच्या समर्थकांमध्ये येथील एका बँकेत पैसे वाटपावरून वाद झाला. स्व. कुंडलिकराव जगताप घटना स्थळावरून निघुन जाताना येथे उपस्थित जमावाने आरडा ओरडा केला. आणि नंतर दोन गटांत तणाव निर्माण होऊन राडा झाल्याने प्रशासनाने वरिष्ठांच्या जमावबंदी कायद्याअंतर्गत व लोक प्रतिनिधी अधिनियम, मुंबई पोलीस कायदा सह Ipc नुसार सुमारे २७ लोकांवर गुन्हे दाखल केले होते. ज्यात आमदार बबनराव पाचपुते, बाळासाहेब महाडिक, बंडु धारकर, अनिकेत जगताप, सुदर्शन पाचपुते, भरत नाहटा, सुनिल वाळके सह मयत कुंडीलकराव जगताप, प्रा. तुकाराम दरेकर, नंदकुमार कोकाटे बरोबर आणखी एकाचा समावेश होता. पुढे हे प्रकरण निकाली काढण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे.

सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत सौ. प्रतिभा पाचपुते यांनी त्यांच्यासोबत असलेल्या इतर पाच महिलांसोबत मतदान केंद्रात वोटिंग मशीनचे पूजन केले. त्यानूसार आचार संहितेचा भंग झाल्याने सौ.पाचपुते समवेत असणाऱ्या पाच महिलांवर लोक प्रतिनिधी अधिनियम कायदा कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले होते.

सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत प्रशांत शेलार यांनी पोस्ट द्वारे करण्यात येणाऱ्या मतपत्रिकेचा लिफाफ्यात टाकताना व्हिडिओ बनुन तो सामाजिक माध्यमांवर टाकला होता. त्यानूसार त्यांच्या सह संतोष खंडागळे यांच्यावर लोक प्रतिनिधी अधिनियम कायदा कलम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकी दरम्यान अनिल कळमकर, सतिश कोळेकर, नवनाथ कळमकर आणि शिवाजी पवार यांनी आपसात मतदान केंद्रावर वाद केला म्हणुन, Ipc, मुंबई पोलीस कायदा व लोक प्रतिनिधी अधिनियम नुसार गुन्हे दाखल करण्यात आले होते.

सन २०१९ च्या लोकसभा निवडणुक प्रक्रियेत बुथवर १०० मीटरच्या आत फोन वापरण्यास बंदी असतानाही गजानन काकडे व्हिडिओ काढताना आढळला म्हणुन त्याच्यावर Ipc, शासकीय गुपिते अधिनियम प्रमाणे गुन्हे दाखल केलते.

सन २०१९ च्या लोकसभा निवडणुक दरम्यान समीर दहातोंडे व सोनार, गारुडकर, तात्या लोखंडे, हे बुथवर मोबाइल घेऊन जातांना पोलीसांनी विचारले असता, त्यांनी पोलिसांशी हुज्जत घातली. म्हणुन त्यांच्यावर Ipc व लोक प्रतिनिधी अधिनियम नुसार गुन्हे दाखल करण्यात आले.

तर, सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकमध्ये भाऊसाहेब कुटे व रतनजी शर्मा हे स्वत:च्या कब्जात ४५ हजारांच्या जिलेटीन कांड्या व डीटोनेटरचे पुडे डिलक्स मोटार सायकल सह आढळून आल्याने त्यांच्यावर Ipc, स्फोटके कायदा कलम नुसार कारवाई करण्यात आली होती.

यातील सर्वांना स्थानिक पोलीस प्रशासनामार्फत मागील पार्श्वभूमी लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक कारवाईच्या नोटिसा बजावण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

स्रोत:(अधिकृत माहिती)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading