विधानसभा निवडणुकीत गोरख आळेकर यांच्या उमेदवारीची चर्चा; ओबीसी नेतृत्वाला मिळणार नवी दिशा..

दिनांक २२ ऑक्टोबर २०२४,श्रीगोंदा:

विधानसभा निवडणुकीच्या जवळ येण्यासोबतच श्रीगोंदा मतदारसंघात निवडणूक लढवण्याची इच्छुक उमेदवारांची संख्या वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर, लोकसभेत ४४,५०० एवढी भरघोस मते मिळवत तिसऱ्या क्रमांकाची मते घेणारे गोरख आळेकर यांनी आता विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आळेकर यांनी यासाठी तयारी सुरु केली असून, त्यांच्याकडे ओबीसी नेतृत्व म्हणून सुद्धा पाहिले जात आहे.

नुकतीच आळेकर यांनी ओबीसी बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष व माजी आमदार प्रकाश अण्णा शेंडगे यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी विधानसभेसाठी उमेदवारीची मागणी केली असून, शेंडगे यांनी देखील आळेकर यांना उमेदवारीबाबत हिरवा कंदील दिल्याची माहिती आहे. त्यामुळे गोरख आळेकर यांच्या विधानसभेची उमेदवारी निश्चित होण्याची शक्यता बळावली आहे.

विधानसभा निवडणुकीबाबत विचारले असता, गोरख आळेकर म्हणाले की, “श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघातील अनेक महत्वाचे प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. साकळाई योजना, डीवाय दहाचा प्रश्न, एमआयडीसीचा विकास, युवकांचे प्रश्न अशा अनेक मुद्द्यांवर आजतागायत कोणतेही ठोस उत्तर मिळालेले नाही. दरवेळी जनतेला विकासाचे आमिष दाखवून सत्तेत येणाऱ्या प्रस्थापित नेत्यांनी जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले आहे. जनतेच्या विकासाऐवजी स्वतःचा व नातेवाईकांचा विकास यांना प्राधान्य दिले गेले आहे.”

गोरख आळेकर यांच्या उमेदवारीमुळे श्रीगोंदा मतदारसंघातील निवडणुकीची लढत होण्याची शक्यता आहे. ओबीसी नेतृत्व म्हणून त्यांचे स्थान अधिक बळकट होत असल्याने, मतदारांमध्ये त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. आता या निवडणुकीत आळेकर यांच्या सहभागामुळे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण कसे बदलते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

स्रोत:(अधीकृत माहिती)

जाहिरात..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading