श्रीगोंद्यातून मनसेच्या तिकिटावर संजय शेळके निवडणूक रिंगणात..

दिनांक २२ ऑक्टोबर २०२४,श्रीगोंदा:

आगामी २०२४ विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) दुसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे. श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघासाठी संजय शेळके यांना मनसेकडून उमेदवारी देण्यात आली आहे. शेळके हे तालुक्यातील एक ओळखले जाणारे सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय नेता आहेत.

संजय शेळके यांनी सामाजिक क्षेत्रात आपली एक विशेष ओळख निर्माण केली आहे. अनेक सामाजिक प्रश्नांसाठी लढा उभारत त्यांनी तालुक्यातील जनतेचा विश्वास संपादन केला आहे. त्यांच्या या कार्यातूनच त्यांना मनसेकडून विधानसभा उमेदवार म्हणून निवडण्यात आले आहे. शेळके यांचा राज ठाकरे यांच्याशी थेट संपर्क असल्याने तालुक्यात त्यांचे नाव चर्चेत आहे.

शेळके यांनी मागील काही वर्षांमध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवले असून, गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत, आरोग्य सेवा आणि शेती विषयक समस्यांवर त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यांच्या या समाजहितैषी कार्यामुळे तालुक्यातील विविध घटकांमध्ये त्यांचा चांगला पाठिंबा आहे.

श्रीगोंदा मतदारसंघात सध्या मनसेकडून शेळके यांची उमेदवारी जाहीर झाल्यामुळे येथील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यांच्या उमेदवारीवर स्थानिक पातळीवर चांगलीच चर्चा रंगली आहे.

स्रोत:(अधीकृत माहिती)

जाहिरात..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading