उद्योगपती बाप्पूशेठ माने यांची श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी; गोरगरीब आणि वंचितांसाठी न्यायाचा लढा उभारणार..

दिनांक २२ऑक्टोबर २०२४,श्रीगोंदा:

श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र राज्य बी.एम. ग्रुपचे अध्यक्ष बाप्पूशेठ माने हे आगामी विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात उतरणार आहेत. त्यांच्या उमेदवारीमागे गोरगरीब, वंचित, दुर्बल, आणि उपेक्षित घटकातील बहुजन समाजाच्या न्याय हक्कासाठी लढा देण्याची त्यांची भूमिका आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाप्रती असलेला प्रचंड विश्वास आणि फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेवर चालणारे बाप्पूशेठ माने हे न्याय व समानतेसाठी काम करणारे नेता म्हणून ओळखले जातात. त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.

उद्योगपती बाप्पूशेठ माने हे तालुक्यातील सर्वसामान्य, गोरगरीब जनतेसाठी नेहमीच उभे राहिलेले आहेत. संकटाच्या प्रसंगी त्यांनी कोणत्याही अडचणीच्या वेळी हात मागे घेतला नाही. मग ते आरोग्याच्या समस्येतील मदत असो, हॉस्पिटलमध्ये उपचार मिळवून देणे असो, किंवा खेळाडूंना प्रोत्साहनपर बक्षीस देणे असो, माने यांनी कायम पुढाकार घेतला आहे. धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांत त्यांनी अन्नदान, मंदिर जिर्णोद्धार आणि गरजू कुटुंबांना निवारा देण्यासाठी आर्थिक साहाय्य केले आहे.

बाप्पूशेठ माने हे फुले, शाहू, आंबेडकर विचारधारेचे कट्टर समर्थक आहेत. अँड. संभाजी आपा बोरुडे यांच्या मार्गदर्शनाखाली फुले/शाहू/आंबेडकर विचारमंच आणि फातिमा शेख विचारमंचाच्या वतीने त्यांनी तालुक्यात विविध जनजागृती कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. त्यांचे कार्य केवळ श्रीगोंदा तालुक्यातच मर्यादित नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचा जनसंपर्क आहे.

बाप्पूशेठ माने यांनी वंचित, दुर्बल आणि उपेक्षित घटकांच्या हक्कासाठी लढा देण्यासाठी अपक्ष उमेदवारी करणार असल्याचे ठामपणे माध्यमांना सांगितले आहे. त्यांच्या उमेदवारीवर स्थानिकांसह विविध समाजघटकांचे लक्ष लागले आहे, आणि त्यांच्या समाजसेवेमुळे त्यांना पाठिंबा मिळण्याची अपेक्षा आहे.

बाप्पूशेठ माने यांचा सामाजिक न्यायासाठीचा हा संघर्ष श्रीगोंदा विधानसभा निवडणुकीत कसा रंगतो, हे येणारा काळच ठरवेल.

स्रोत:(प्रसिध्दी पत्र)

जाहिरात..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading