दिनांक २७ मार्च २०२४, श्रीगोंदा:
तालुक्यातील शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने उद्या दिनांक २८ मार्च २०२४ रोजी तिथीनुसार साजरी होणारी शिवजयंती शिवसेना जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे व उपास्थित मान्यवरांच्या शुभहस्ते पुजन करून मिरवणुक काढत विवीध सामाजिक उपक्रमाने साजरी करण्यात येणार आहे. याबाबत शिवजयंती उत्सव समिती अध्यक्ष शिवसेना तालुका प्रमुख बाळासाहेब दुतारे यांच्या नेतृत्वखालील सदरील जयंती मोठ्या उस्तहात साजरी करण्यात येईल अशी माहिती बाळासाहेब दुतारे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
उद्या दिनांक २८ मार्च २०२४ रोजी शनीचौक येथे सकाळी १०:०० वाजता शिवजयंती निमित्त उपास्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येणार आहे.
सायंकाळी ५:०० वाजता शनीचौक येथून शिवसेना तालुका प्रमुख बाळासाहेब दुतारे यांच्या नेतृत्वाखालील प्रतिमेची मिरवणूक निघणार असुन, मिरवणूक शुभारंभ शिवसेना उपनेते साजन भैया पाचपुते व उपास्थित मान्यवरांच्या
शुभ हस्ते होणारं आहे. यावेळी उपस्थित राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता, प्रशासकिय क्षेत्रातील मान्यवर व शिवसैनिकांचा सन्मान करण्यात येणार आहे.
मिरवणूक मार्ग: शनीचौक – महमंद बाबा पटांगण – सावरकर चौक – जि.प. शाळा – शिवनेरी चौक – रोहिदास चौक – श्रीराम चौक – छत्रपती शिवाजी चौक – रविवार पेठ मार्गे शनीचौक येथे मिरवणुकीची सांगता होईल.
या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते, श्रीगोंदा तालुक्यातील आणि शहरातील नागरिकांनी उपास्थित रहावे. असे आवाहन शिव जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष बाळासाहेब दुतारे, उपाध्यक्ष दिलीपराव आंनदकर, संतोष खेतमाळीस, सुरेश देशमुख, हरिभाऊ काळे, नूतन पानसरे, जनाबाई गायकवाड, रावसाहेब डांगे, नीलेश साळुंखे, सागर खेडकर, चंद्रकांत धोत्रे, राजू तोरडे, रघुनाथ सुर्यवंशी, जमीरभाई शेख, शिवाजी समदडे, ओंकार शिंदे, प्रशांत जमदाडे, शरद नागवडे, बाबा चोरमले, नितिन शिंदे, शिवाजी दांगडे, संभाजी घोडके, सुशांत भंडारी, दादा मुंडेकरी, कृष्णा भालेराव, सुनिल शिंदे, राहुल भालेकर व तालुक्यातील शिवसैनिक, युवासैनिक यांनी केले आहे.
स्रोत:(प्रसिध्दी पत्र)
