दिनांक २७ मार्च २०२४, श्रीगोंदा:
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज झालेले विखे, लंके आणि इतर डझनभर संघटनांचे पदाधिकारी विशेष करून राज्य आणि देश पातळीवर निरनिराळ्या आंदोलनांच्या माध्यमातून आपल्या मागण्यांसाठी न्यायिक लढा सुरू ठेवणारे ओबीसी आणि मराठा समाजाचे प्रतिनिधी आणि नेते जरांगे व भुजबळ समर्थक विखे, लंके यांच्या तुलनेत येथे येवढे सक्रिय नसल्याचे समोर येत आहे.
आरक्षण मिळावे म्हणुन, सर्वत्र जोरदार आंदोलन करणारे मराठा समाजाचे आंदोलक आणि आरक्षण बचाव आंदोलनात सहभागी ओबीसी समाजाचे पदाधिकारी यांची निःपक्ष आणि स्वतंत्र अस्तित्व तयार करण्याची भूमिका संथ गतीने या मतदार संघात वाटचाल करतांना दिसते आहे.
एकीकडे विविध सामाजिक, राजकीय संघटनांचे प्रतिनिधी, वेगवेगळ्या विचारांचे नेते, डावे, उजवे विचारसरणीचे कार्यकर्ते आणि त्यांच्या संघटना, पुरोगामी, आंबेडकरवादी असणारे पदाधिकारी आणि त्यांच्या पक्ष व संघटना विखे, लंके यांच्या संसाधनांसमोर फारच अपुऱ्या वाटू लागल्या असुन, त्यांची या निडणुकांतील राजकीय भुमिका धूसर वाटू लागली आहे.
कारण विखे पाटील आणि लंके साहेब यांचीच चर्चा प्रत्येक भागात लोकांच्या बोलण्यात जाणवत आहे. खरतर निवडणुका म्हंटले की, सर्वोतोपरी संपन्न असणारा उमेदवार रिंगणात असल्यास लोकांनाही आधार वाटतो.. तसे वातावरण विखे आणि लंके यांनी निर्माण करण्याचा प्रयत्न मतदार संघात चालवलेला आहे.
जे विखे पाटील त्यांच्या कार्यकर्त्यांचा फोन उचलण्यास टाळाटाळ करायचे.. तेच आत्ता कोणीही फोन केल्यास फोन उचलतात.. ज्या विखेनीं अनेक जवळच्या कार्यकर्त्यांना किरकोळ बाबिंवरून नाराज केले.. ते रस्त्यात गाड्या थांबऊन विचारपूस करतात.. तरी लोकं जवळ जात नाहित.. मागील कार्यकाळात विखेंचे कार्यक्षेत्रात दर्शन दुर्मीळ होते. याउलट ते रोज मतदार संघात प्रत्येकाच्या सुख दुःखात सहभागी होत आहेत. मयत, दशक्रिया, पुण्यानुमोदन, जयंत्या, पुण्यतिथी, वर्षश्राद्ध, बर्थडे, एका रस्त्यावर रांगेत येणारी सर्व लग्न आमंत्रण असुदे, नाहीतर नसुदेत.. तरी लोकांच्या सुख दुःखात सहभागी होणारे विखे, लंके यांची कृत्रिम चर्चा करण्यासाठी कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या माध्यमांतून यंत्रणा सक्रीय करून लोकांच्या सतत स्मरणात राहण्यासाठी वेगवेगळ्या तऱ्हेने संपर्क आणि छुपा प्रचार सुरु असून, यात विखे आणि लंके हे दोघेच आघाडीवर आहेत.
निवडणूक कालखंडात अचानक सक्रिय होणाऱ्या या फॉर्मुल्याला समीक्षक व निवडणूक अभ्यासक law of attraction म्हणतात.. अनेक पदाधिकारी, संघटना आणि पक्ष असताना कोण्या ठराविक व्यक्तीची चर्चा घडवुन आनने व सामान्य माणसाच्या विचारात तीच मानस किंवा उमेदवार चर्चेत तेवत ठेवणे.. याला ‘law of attraction’ म्हणतात. तोच काहीसा प्रकार या मतदार संघात डॉ. विखे आणि लंके यांच्या निमीत्ताने अनुभवायला मिळतोय..
मात्र, येथील जनता, मतदार हे फसव्या आणि दिखाऊ गोष्टींना प्राधान्य न देता, वसुस्थिती आणि प्रत्यक्ष अनुभवावर विश्र्वास ठेवणारी आहेत. त्यामूळे ‘हुल दाखवुन तपेल उचलणे..’ येथे येवढे सोपे नाही. आणि येवढ्या वर्षात न सक्रिय होता अचानक निवडणुकांच्या तोंडावर फिरणे, भेटी घेने, लोकांना गोड बोलणे, रस्त्यात भेटून अभिवादन करणे, सुख दुःखात बळच सहभागी होणे, हे सर्व कृत्रिम भाव येथील संवेदना जागृत असणाऱ्या लोकांना जाणवत आहेत.. त्यासाठी येथील “जनतेवर आईची माया करणारा नेता हवाय.. आयाची (लोकांच्या मुलांची पैश्यासाठी सांभाळ करणारी बाई) पोरकी आणि कृत्रिम भावना लोकांच्या लगेच लक्ष्यात येते..
स्रोत:(संपादकीय)
