श्रीगोंद्यातील या घटनेत घातपाताचा संशय..! प्रेमप्रकरणातून दोन महिन्यापासून आपसात वाद चालू असताना त्याचा संशयास्पद मृत्यु झाल्याने.. कुटुंबीयांची खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी..

दिनांक २८ मार्च २०२४, श्रीगोंदा:

मागासवर्गीय समाजातील तरुण सनी सुडगे रा. टाकळी लोणार ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर याचा दि. १७ मार्च २०२४ रोजी संशयास्पद मृत्यू झाला. मयत तरुणाचा भाऊ फिर्यादी प्रवीण सुडगे याने याप्रकरणी घातपाताचा संशय व्यक्त केला असतानाही श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याऐवजी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दिनांक १८ मार्च २०२४ रोजी दाखल करण्यात आला आहे.

याबाबत फिर्यादी प्रवीण सुडगे यांनी पोलीस अधिक्षक अहमदनगर यांना निवेदन देवून मयत सनी सुडगे यांच्या मृत्यूबाबत घातपाताचा संशय व्यक्त करत आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.

स्थानिक प्रशासन व वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात पिडित कुटुंबीयांनी नमूद केले आहे की, मयत तरुण हा आरोपीकडे ट्रक्टर ड्रायव्हर म्हणून काम करत होता. प्रेमप्रकरणामुळे दोन महिन्यापासून त्यांचे वाद चालू होते. या वादातूनच त्याची हत्या झाल्याचा मयत तरुणाच्या कुटुंबातील सदस्य तसेच श्रीगोंदा तालुक्यातील समाजातील, चळवळीतील कार्यकर्ते संशय व्यक्त करत आहेत. सदरील घडलेली घटना अत्यंत वाईट असून, समस्त आंबेडकरी समाजात याविषयी मोठा रोष निर्माण झालेला आहे. सदर घटनेच्या अनुषंगाने राज्यात व देशात तीव्र स्वरूपाचे पडसाद उमटतील.. असे निवेदनात म्हंटले आहे.

यावेळी श्रीगोंदा पोलीस व स्थानिक प्रशासनास निवेदन सादर करतांना RPI चे तालुकाध्यक्ष राजाभाऊ जगताप, भाऊसाहेब घोडके, कुणाल शिरवाळे, युवराज घोडके, योगेश घोडके, किरण शिंदे, शशिकांत घोडके, शेखर घोडके, अमोल घोडके, जॉन घोडके इत्यादी आरपीआयचे कार्यकर्ते उपस्थित होते.

राजा जगताप (RPI):
पिडीत कुटुंबावर आरोपी व आरोपीचे नातलग केस मागे घेण्यासाठी दबाव आणत आहेत. पिडीत कुटुंबाला पोलीस संरक्षण मिळावे. तसेच, सदर घटनेची सखोल चौकशी करून, संबंधित आरोपी अशोक धालवडेवर खुनाचा गुन्हा दाखल करून, आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी. अन्यथा रिपाईच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन राज्यात आणि देशात छेडण्यात येईल..

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply